पाणीच नसल्याने शस्त्रक्रियाही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:25 PM2017-08-17T23:25:16+5:302017-08-17T23:25:16+5:30

येथील जिल्हासामान्य रुग्णालयात नेहमीच माणुकीचे दर्शन घडते. मात्र पाण्यासाठीच वारंवार का दुजाभाव केला जात असावा? असा सवाल आता रुग्णांसह नातेवाईक करीत आहेत. दिवसेंदिवस येथे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.

Due to lack of water, surgery too closed | पाणीच नसल्याने शस्त्रक्रियाही बंद

पाणीच नसल्याने शस्त्रक्रियाही बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हासामान्य रुग्णालयात नेहमीच माणुकीचे दर्शन घडते. मात्र पाण्यासाठीच वारंवार का दुजाभाव केला जात असावा? असा सवाल आता रुग्णांसह नातेवाईक करीत आहेत. दिवसेंदिवस येथे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. तो सोडविण्यासाठी ठोस उपयोजना होत नसल्याने पाण्यासाठी रुग्णांसह नातेवाईकांना भटकंती करत पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. तर शस्त्रक्रियाही बंद झाल्या आहेत.
हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालय नेहमीच विविध कारणाने चर्चेत राहते. तसे या ठिकाणी रुग्णांची गैरसोय होऊ दिली जात नसली तरीही पाणी प्रश्न काही केल्या सुटलेला नाही. त्यातच अधून- मधून पाण्याच्या जबाबदारी एकमेकावर ढकलल्या जात असल्याने, यामध्ये मरण होत आहे ते येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे व नातेवाईकांचे. एवढेच काय तर येथे कार्य बजावणाºया डॉक्टरांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गंभीर प्रश्न म्हणजे रुग्णांना येथे आज घडिला पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे रुग्ण परिसरात पाण्यासाठी सैरावैरा भटकंती करुन हॉटेलवर जावून पाणी पित आहेत. तेथेही काही घेतलेच तर पाणी दिले जात असल्याचे रुग्ण सांगत होते. अशा भयंकर परिस्थितीत मात्र ‘बॉटल’ च्या पाण्याला मोठी मागणी वाढली आहे. मागील २० ते २२ दिवसांपासून या ठिकाणी पाणीच नसल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगत होते. त्यामुळे येथे उपचारासाठी आलेले रुग्ण पाण्यासाठी नातेवाईकाडे धाव घेत असल्याचे विदारक चित्र गुरुवारी दिसून आले. याठिकाणी असलेले वाटॅर कुलर नेहमीच बंद असल्याचेही रुग्ण सांगत होते.
त्यातच दोन दिवसांपासून रुग्णालयाला पाणीपुरवठा करणारीच पाईपलाईन फुटल्याने पाणी बंद झाले आहे. त्यामुळे रुग्णालयातील सर्वच स्वच्छता गृहाचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तर पाणीच नसल्यामुळे साफाईसाठीही अडचणी येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात दुर्गंधी येत आहे. तसेच वार्डातील पंखे व लाईटचीही समस्याही सुटलेली नसल्याने रुग्णांना डासांचा व अंधाराचा सामना करावा लागत असल्याचे रुग्ण सांगत होते. तसेच पाणीच नसल्याने या ठिकाणी मागील आठ दिवसांपासून शस्त्रक्रियादेखील बंद झाल्या आहेत. त्यामुळे येथून रुग्ण रेफरचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. याचा रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. वातावरणातील बदलामुळे जिल्हासामान्य रुग्णालयात मागील १० ते १५ दिवसांपासून उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र येथील स्थिती पाहिल्यानंतर बहुतांश रुग्ण तर एक ते दोन दिवस उपचार घेत असून, पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यामुळे रुग्णांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या टाक्याही कोरड्या ठण पडल्याने जेवनानंतर हात धुण्यासही येथे पाणी नाही. त्यामुळे पिण्यासह धुण्यासाठी बॉटलच्याच पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Due to lack of water, surgery too closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.