CAA : केंद्राच्या कायद्यांमुळे देशात इन्कलाब घडणार : मनोज झा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:24 PM2019-12-28T12:24:05+5:302019-12-28T12:27:13+5:30
एनआरसी, सीएए कायद्याने आपल्याला जगणे शिकवून दिले.
औरंगाबाद : केंद्राने आणलेले कायदे या देशात इन्कलाब घडविणार आहेत. संविधान वाचविणार, हे निश्चित. वो झूट बोलता रहा सलीके से...मै ऐतबार ना करता तो क्या करता...अशा शब्दांत मनोज झा यांनी नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला.
एनआरसी, सीएए कायद्याने आपल्याला जगणे शिकवून दिले. या मातीशी प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात अथांग जनसागराच्या माध्यमाने उभा आहे. महात्मा गांधी यांची काठी चालते तेव्हा अंगावर चांगले वळ उमटतात. बापूंच्या चष्म्यातून या देशाकडे बघा, असे आवाहनही त्यांनी केले. उपस्थित तरुणांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळत होता.
एनआरसी, सीएए कायद्याच्या विरोधात औरंगाबाद शहरातील कृती समितीने आयोजित केलेल्या महामोर्चात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर, आरजेडी पक्षाचे राज्यसभेतील खा. मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड सहभागी झाले. त्यांनी उपस्थितांना आपल्या शैलीत मार्गदर्शनही केले. मान्यवर मंडळींच्या उपस्थितीने कार्यक्रम आणखी यशस्वी झाला.