लॉकडाऊनमुळे १२२७ कैद्यांचा व्हिडिओ कॉलवरूनच नातेवाइकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:02 AM2021-02-09T04:02:01+5:302021-02-09T04:02:01+5:30

औरंगाबाद : कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे कारागृहात जाऊन नातेवाईक कैद्यांना भेटण्यास मनाई असल्यामुळे हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील १२५० ...

Due to the lockdown, 1227 prisoners communicated with their relatives through video calls | लॉकडाऊनमुळे १२२७ कैद्यांचा व्हिडिओ कॉलवरूनच नातेवाइकांशी संवाद

लॉकडाऊनमुळे १२२७ कैद्यांचा व्हिडिओ कॉलवरूनच नातेवाइकांशी संवाद

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे कारागृहात जाऊन नातेवाईक कैद्यांना भेटण्यास मनाई असल्यामुळे हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील १२५० कैद्यांना नातेवाइकांच्या प्रत्यक्ष भेटी घेता आलेल्या नाहीत. परंतु कारागृह प्रशासनाने उपलब्ध केलेल्या ॲण्ड्राइड फोनमुळे व्हिडिओ कॉलद्वारे कैद्यांना नातेवाइकांशी संवाद साधता आला.

मराठवाड्यातील सर्वात मोठे म्हणून हर्सूल कारागृहाकडे पाहिले जाते. १२२७ कैदी ठेवण्याची क्षमता येथे आहे. असे असले तरी गतवर्षीपर्यंत हर्सूल कारागृहातील कैद्यांची संख्या क्षमतेच्या दीड किंवा दुप्पट अशीच राहिली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी २१ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू झाले. राज्यसरकारने कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सात वर्षापेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यातील कैद्यांना तातडीने जामीन मंजूर केला जात आहे. तसेच न्यायालयीन कोठडीतील कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. तसेच शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोलवर मुक्त करण्यात आले. खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्या व चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांनाही पॅरोल मंजूर करण्यात आले. अशा प्रकारे लॉकडाऊन कालावधीत तब्बल ७५० कैद्यांना पॅरोल मंजूर करण्यात आला. ज्या कैद्यांना पॅरोल मंजूर झाला नाही त्यांना कारागृह प्रशासनाने व्हिडिओ कॉल करून नातेवाइकांशी बोलण्याची संधी उपलब्ध केल्याची माहिती कारागृह अधीक्षक जयंत नाईक यांनी दिली.

=======

महिला कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय

येथील काही महिला कैद्यांचे नातेवाईक दुसऱ्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अशा महिला कैद्यांना त्यांच्या नातेवाईक कैद्यांशी संवाद साधण्यासाठी कारागृह प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध केली.

=======(==========

हर्सूल कारागृहाची कैद्यांची क्षमता - १ हजार २०० कैदी

==========

सध्या कारागृहातील कैदी - १ हजार २२७

==========

पॅरोलवर सोडलेले कैदी -७५०

============

कोट

कोरोनामुळे शासनाने कैद्यांना त्यांच्या नातेवाइकांशी कारागृहात प्रत्यक्ष भेटीची सुविधा बंद केली. मात्र कैद्यांना त्यांच्या नातेवाइकांना प्रत्यक्ष भेट घेता येत नसली तरी त्यांना व्हिडिओ कॉल, फोन कॉल करून नातेवाइकांना बोलण्याची सुविधा उपलब्ध केली. महिला कैद्यांना दुसऱ्या कारागृहामधील नातेवाईक कैद्यांशी बोलण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा हर्सूल कारागृह प्रशासन देत आहे.

जयंत नाईक, अधीक्षक, हर्सूल मध्यवर्ती कारागृह

Web Title: Due to the lockdown, 1227 prisoners communicated with their relatives through video calls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.