कर न भरल्याने सरपंचपद गमावले
By Admin | Published: August 26, 2014 02:26 AM2014-08-26T02:26:27+5:302014-08-27T00:14:10+5:30
औरंगाबाद : मालमत्ता कराची नोटीस मिळूनही हा कर न भरल्यामुळे गंगापूर तालुक्यातील कदीम टाकळीचे सरपंच राजू पुऱ्हे यांना पद गमवावे लागले.
औरंगाबाद : मालमत्ता कराची नोटीस मिळूनही हा कर न भरल्यामुळे गंगापूर तालुक्यातील कदीम टाकळीचे सरपंच राजू पुऱ्हे यांना पद गमवावे लागले. यासंबंधीचा निर्णय नुकताच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
आॅक्टोबर २०१२ मध्ये राजू पुऱ्हे यांची सरपंचपदी निवड झाली. शिवाजीराव भिकन चंदेल यांनी अॅड. रवींद्र व्ही.गोरे यांच्यामार्फत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ (१) (ह) नुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी नमूद केले की, पुऱ्हे यांनी २ मे २०१३ ची कर बिलाची मागची नोटीस मिळूनही तो मुदतीत (९० दिवसांत) भरलेला नाही. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करावे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी गंगापूर पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडून याविषयीचा चौकशी अहवाल मागवला. या अहवालात पुऱ्हे यांनी तीन महिन्यांच्या आत बिलाचा भरणा केला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविले. यावेळी अॅड. गोरे यांना अॅड. गौतम पहिलवान,अॅड. धनंजय क्षीरसागर यांनी सहकार्य केले.