ऑनलाईन प्रणालीमुळे रेशनचे १९ हजार टन धान्य वाचल्याचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 06:30 PM2018-11-15T18:30:59+5:302018-11-15T18:36:16+5:30

मार्च ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १९ हजार ३८० मेट्रिक टन धान्याची बचत झाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला.

Due to the online system, 19 thousand tonnes of grains are from ration claimed to be saved | ऑनलाईन प्रणालीमुळे रेशनचे १९ हजार टन धान्य वाचल्याचा दावा 

ऑनलाईन प्रणालीमुळे रेशनचे १९ हजार टन धान्य वाचल्याचा दावा 

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात ७ लाख ७९ हजार शिधापत्रिकाधारकत्यांना १ हजार ८०१ रेशन दुकानांतून दरमहा धान्याचे वितरण होते.

औरंगाबाद : मार्च ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १९ हजार ३८० मेट्रिक टन धान्याची बचत झाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने बुधवारी पत्रकार परिषदेत केला. सोबतच आॅनलाईन प्रणालीमुळे काळ्या-बाजारात धान्य जात नसल्याची हमी पुरवठा विभागाने दिली.

जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांवर मार्च २०१८ पासून ई-पॉस बसविण्यात आले असून, रेशन दुकानातील धान्य वाटपात पारदर्शकता असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांनी ठणकावून सांगितले.ई-पॉसद्वारे धान्याचे वाटप करण्याचा शासन आदेश असून, जिल्ह्यात मार्च २०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील १ हजार ८०१ रेशन दुकानांवर ई-पॉस बसविण्यात आले आहेत. त्या आधारेच धान्य वितरण करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दुकानादारांना दिले आहेत.

जिल्ह्याला मार्च ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १ लाख ३७ हजार ८३५ मेट्रिक टन गहू आणि तांदळाचे नियतन मंजूर होते. तहसीलदारांच्या मागणीनुसार यापैकी एक लाख १८ हजार ४५३ मेट्रिक टन धान्याचे वितरण जिल्ह्यातील रेशन दुकानादारांना करण्यात आले. ई-पॉसआधारे दरमहा धान्य वाटप झाल्याने तब्बल १३ हजार ३८६ मेट्रिक टन गहू, तर ५ हजार ९९४ मेट्रिक टन तांदळाची बचत झाल्याचा दावा पुरवठा विभाग करीत आहे. शिधापत्रिका असताना धान्य न घेणाऱ्या शहरातील ३०, ग्रामीण भागातील ४० हजार नागरिकांना पुरवठा विभागाकडून नोटीस बजाविण्यात आल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

जिल्ह्यात ७ लाख ७९ हजार शिधापत्रिकाधारक
जिल्ह्यात एकूण ७ लाख ७९ हजार ११८ कौटुंबिक शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना १ हजार ८०१ रेशन दुकानांतून दरमहा धान्याचे वितरण होते. त्यात अंत्योदय योजनेचे ७० हजार ४७३ शिधापत्रिका आहेत. त्यापैकी ६० हजार ४९१ पत्रिका आधार कार्डशी संलग्न आहेत. यासह प्राधान्य कुटुंब योजनेत २ लाख २ हजार ८१९ पैकी एक लाख ८१ हजार ५६, तर ए.पी.एल. शेतकरी योजनेत ४ लाख १८ हजार ८२५ पैकी ३ लाख २३ हजार २८५ शिधापत्रिकांचे आधार सीडिंग झाल्याने योग्य लाभार्थ्यांपर्यंत धान्य जात असल्याचे पुरवठा विभागाचे मत आहे. 

Web Title: Due to the online system, 19 thousand tonnes of grains are from ration claimed to be saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.