कोषागारात देयकासाठी रात्री १० वाजेपर्यंत गर्दी
By Admin | Published: April 1, 2016 12:54 AM2016-04-01T00:54:16+5:302016-04-01T00:56:02+5:30
नांदेड : चालू आर्थिक वर्षात आलेल्या निधींची देयके जिल्हा कोषागारात सादर करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी ३१ मार्चच्या रात्री १० वाजेपर्यंत रांगा लावल्या़
नांदेड : चालू आर्थिक वर्षात आलेल्या निधींची देयके जिल्हा कोषागारात सादर करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी ३१ मार्चच्या रात्री १० वाजेपर्यंत रांगा लावल्या़ प्रााप्त देयकांचा हिशोब व विवरण शासनाकडे सादर करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रात्र जागून काढावी लागली़
विविध योजनांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी यंत्रणेकडे वर्ग होतो़ प्राप्त व खर्च झालेल्या निधीचा वार्षिक ताळेबंद ३१ मार्चअखेर सादर करणे बंधनकारक असते़ जिल्हा नियोजन समिती, आदिवासी विभाग, तालुका विकास यंत्रणा, नागरी सुविधा आदीमार्फत प्राप्त निधी विविध योजनेसाठी खर्च होतो़ नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी खर्चाचा ताळेबंद जिल्हा कोषागारात सादर करावा लागतो़ तो सादर करण्यासाठी गुरुवारी अक्षरश: रांगा लागल्या़ देयके स्विकारण्यासाठी कोषागारात अतिरीक्त यंत्रणा उपलब्ध करुन दिल्याचे अप्पर कोषागार अधिकारी एऩ पी़ पाचंगे यांनी सांगितले़
शिवाजीनगर येथील स्टेट बँक आॅफ हैदराबादचे जसवींदरसिंघ टुटेजा यांनी सांगितले, मागील वर्षी पेक्षा यंदा शासकीय चलनांची संख्याही कमी आहे़ यावेळेस केवळ १ हजार चालन दाखल झाले तर मागील वर्षी ३ हजार चालनांची संख्या होती़ कोषागार कार्यालयातून येणाऱ्या चालनांची संख्या कमी होती़ बँकेचे सहा़ महाप्रबंधक हनमंतराव, कॅशीअर अडबलवार यांच्यासह बँकेतील सर्व कर्मचारी मार्च एंडच्या कामात मग्न होते़