पावसाने रस्त्याची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:21 AM2017-08-25T00:21:53+5:302017-08-25T00:21:53+5:30
शनिवारी आणि रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील जोड रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे़ दरम्यान, शिंदे टाकळी आणि सेलवाडी या रस्त्यावरून वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शहरात येताना अडचणी निर्माण होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शनिवारी आणि रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील जोड रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे़ दरम्यान, शिंदे टाकळी आणि सेलवाडी या रस्त्यावरून वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शहरात येताना अडचणी निर्माण होत आहेत.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शनिवारी व रविवारी तालुक्यात संततधार पाऊस झाला. परिणामी ओढे, नाल्यांना पूर आला. पुराच्या पाण्यामुळे रवळगाव ते शिंदे टाकळी मार्गावरील आहेरबोरगावजवळ असलेल्या नाल्यावरील पुलाचा ढापा वाहून गेला.
त्यामुळे मोठा खड्डा पडला. त्यामुळे या मार्गावरील चारचाकी वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. शिंदे टाकळी येथे येणारी बसही पुलामुळे बंद झाली आहे. त्यामुळे आहेर बोरगाव, सिद्धनाथ बोरगाव, मालेटाकळी, शिंदे टाकळी येथील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना सेलू येथे येताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांवर पायी येण्याची वेळ आली आहे.
वालूर- सेलवाडी या जोड रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. काही दिवसांपूर्वीच टाकलेला मुरूम जोरदार पावसामुळे वाहून गेला. परिणामी या गावच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलावरून चारचाकी वाहने चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने कायमस्वरूपी दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.