‘लोकजागृतीमुळे लोकशाही परिपक्वतेच्या दिशेने’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 05:57 AM2018-03-13T05:57:19+5:302018-03-13T05:57:23+5:30

सध्या जग जवळ आले आहे. यात माणूस मोठा बनला. लोक रस्त्यावर येऊन सरकार, प्रशासनाला जाब विचारत आहेत. या लोकजागृतीमुळे लोकशाही परिपक्व होत आहे. राजकारणी कालसापेक्ष व स्थलसापेक्ष असतात. समाज झपाट्याने बदलत आहे. त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, असे मत नागपूर लोकमतचे संपादक व लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

Due to the rise of democracy in democracy, | ‘लोकजागृतीमुळे लोकशाही परिपक्वतेच्या दिशेने’

‘लोकजागृतीमुळे लोकशाही परिपक्वतेच्या दिशेने’

googlenewsNext

औरंगाबाद : सध्या जग जवळ आले आहे. यात माणूस मोठा बनला. लोक रस्त्यावर येऊन सरकार, प्रशासनाला जाब विचारत आहेत. या लोकजागृतीमुळे लोकशाही परिपक्व होत आहे. राजकारणी कालसापेक्ष व स्थलसापेक्ष असतात. समाज झपाट्याने बदलत आहे. त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, असे मत नागपूर लोकमतचे संपादक व लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार वितरण सोमवारी मसापच्या ना. गो. नांदापूरकर सभागृहात झाले. प्रा.सुरेश द्वादशीवार यांच्या ‘युगांतर’ ग्रंथास यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार व नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. दिलीप घारे आणि प्रा. यशवंत देशमुख यांना विभागून देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रत्येकी ११ हजार रुपये रोख देऊन त्यांना सन्मानित केले. मंचावर ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, प्रा.मनोहर जाधव आणि प्रा.जयंत शेवतेकर, डॉ. दादा गोरे उपस्थित होते.
प्रा. द्वादशीवार म्हणाले, राजकारणातली माणसे चांगली नसतात हे चुकीचे आहे. राजकारणी, साहित्यिक या मानवनिर्मित भिंती आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, सरदार वल्लभभाई पटेल हे राजकारण्यांपेक्षा अप्रतिम लेखक होते.

Web Title: Due to the rise of democracy in democracy,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.