सातारा-देवळाईमुळे सभेत खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:42 AM2018-09-05T00:42:47+5:302018-09-05T00:43:13+5:30
समांतर जलवाहिनी प्रकल्पात सातारा-देवळाई परिसराचाही समावेश करावा, अशी मागणी मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजू शिंदे यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : समांतर जलवाहिनी प्रकल्पात सातारा-देवळाई परिसराचाही समावेश करावा, अशी मागणी मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजू शिंदे यांनी केली. महापौरांनी यावर स्वतंत्र प्रकल्प आराखडा तयार करण्यात येत असून, त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्याचे आश्वासन दिले. सेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांनी सातारा-देवळाईचा मनपात दोन वर्षांपूर्वी समावेश झाला. २५ वर्षांपूर्वी हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा आदी १८ खेड्यांचा समावेश झाला. आजपर्यंत पाणी तर सोडा रस्ते, पथदिवे आम्हाला मिळालेले नाहीत. आता हे सहन होणार नाही म्हणत त्यांनी दंड थोपटले.
एलईडी दिवे सातारा-देवळाईसाठी मंजूर करण्यात आले. सिमेंट रस्ते, डिफर पेमेंटचे रस्ते सातारा देवळाईला देण्यात येत आहेत. दोन वर्षे झाली हा परिसर मनपात आला आहे. २५ वर्षांपासून विकास कामांची प्रतीक्षा करणाऱ्यांचाही विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. याचवेळी नगरसेवक राज वानखेडे बोलण्यास उभे राहिले.