जुन्या वादातून मध्यरात्री टोळके घरात घुसले, तरुणास बेदम मारहाण

By राम शिनगारे | Published: March 21, 2023 06:33 PM2023-03-21T18:33:29+5:302023-03-21T18:33:39+5:30

सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल : घरातील मौल्यवान वस्तू हडप

Due to an old dispute, gangs entered the house in the middle of the night, brutally beating the young man | जुन्या वादातून मध्यरात्री टोळके घरात घुसले, तरुणास बेदम मारहाण

जुन्या वादातून मध्यरात्री टोळके घरात घुसले, तरुणास बेदम मारहाण

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातुन २५ ते ३० जणांच्या टोळक्याने एकाच्या घरात घुसून बेदम मारहाण केली. ही घटना १९ मार्च रोजी मध्यरात्रीनंतर १२.४५ वाजता लोटाकारंजा परिसरात घडली. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात २० मार्च रोजी दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

मुसा खान युसूफ खान (रा. सैय्यद फंक्शन हॉलजवळ, लोटाकारंजा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते १९ मार्चच्या रात्री कुटुंबातील सदस्यासह झाेपलेले होते. तेव्हा इद्रिस वाहेद बाशवान, जुबेर बाशवान, सोहेल बाशवान, नासेर बाशवान, बाशीद बाशवान, शहाब अमर बाशवान, वाजेद अमर बाशवान, युसूफ अमर बाशवान, गजाफी फैसल बाशवान (सर्व रा.लोटाकारंजा) यांच्यासह २५ ते ३० जणांचे टोळके मध्यरात्रीनंतर १.४५ वाजता त्यांच्या घरासमोर आले. घराच्या समोर लावलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच घरावरही दगडफेक केली. त्यात घराच्याही काचा फुटल्या. त्यानंतर बळजबरीने मुसा खान यांच्या घरात टोळके शिरले. आत शिरल्यानंतर फिर्यादीच्या पत्नी, भावजयीसह इतरांना काठ्या, दगडांनी मारहाण केली. त्यानंतर घरातील महिलांचे ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. तपास उपनिरीक्षक सुभाष हिवराळे करीत आहेत.

युवकास बेदम मारहाण
लोटाकारंजा येथेच याच टोळक्याने मुख्तार शेख हुसैन (रा. नूर कॉलनी) यांच्या मुलास सोहेल बाशवान, नासेर बाशवान, इद्रीश बाशवान, बाशीद बाशवान, युसूफ बाशवान, वाजेद बाशवान, शहाब बाशवान यांनी १९ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता बेदम मारहाण केली. या आरोपींच्या विरोधात २० मार्च रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. तपास उपनिरीक्षक निवृत्ती गायके करीत आहेत.

Web Title: Due to an old dispute, gangs entered the house in the middle of the night, brutally beating the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.