जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करत शेतकऱ्याची हत्या, आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 08:07 PM2022-08-18T20:07:19+5:302022-08-18T20:07:39+5:30
आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे तीन पथके रवाना झाले आहेत.
औरंगाबाद: शहरातील पिसादेवी परिसरातील शेतीच्या वादातून दिवसाढवळ्या कुऱ्हाढ डोक्यात घालून शेतकर्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. जनार्धन कासार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जनार्धन कासार याच्या जमिनीचा काहींसोबत वाद सुरु आहे. 2008 पासून जमिनीचा वाद असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, आज एक वाजेच्या सुमारास कासार शेतीमध्ये कामाला गेले असता त्यांच्यावर शिवाजी अवताडे, बाळू अवताडे, गिरीजा अवताडे , भारत अवताडे आणि महादू अवताडे यांनी हल्ला केला. कासार यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यातच त्यांच्या मृत्यू झाला. दरम्यान, आरोपींवर अट्रोसिटी दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना
नातेवाईकांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे तीन पथके रवाना झाले आहेत. अशी माहिती चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास गात यांनी दिली.