पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे गळफास घेतलेला युवक वाचला

By राम शिनगारे | Published: September 22, 2022 08:38 PM2022-09-22T20:38:41+5:302022-09-22T20:39:33+5:30

पडेगाव भागातील घटना: गंभीर जखमी युवकावर घाटीतील आयसीयूत उपचार

due to the intervention of the police the youth who hanged himself was saved | पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे गळफास घेतलेला युवक वाचला

पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे गळफास घेतलेला युवक वाचला

googlenewsNext

राम शिनगारे

औरंगाबाद : 'देव तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय पडेगाव भागातील एका युवकाच्या बाबतीत आला आहे. आत्महत्या करण्यासाठी युवक घरातील एका खोलीत साडी घेऊन गेला. तेव्हा त्याच्या भावाने पोलिसांच्या ११२ वर फोन करुन तातडीची मदत मागितली. छावणी पोलिसांनीही प्रसंगावधान राखत तात्काळ घरी पोहचले. घरी गेल्यानंतर खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा युवकाने गळफास घेतला होता. त्यास उचलुन धरत कात्रीने गळफास घेतलेली साडी कापून काढत युवकास वाचवले. गंभीर जखमी युवकावर घाटीतील आयसीयूत उपचार सुरु आहेत.

पडेगाव परिसरातील सप्तशृंगी कॉलनीत राहणारा २० वर्षांचा युवक राहत्या घरात गळफास घेण्यासाठी साडी घेऊन खोलीत गेला आहे. त्यासाठी तात्काळ पोलिसांची मदत हवी असल्याचा कॉल ११२ नंबरवर बुधवारी सायंकाळी आला. छावणीच्या ११२ च्या गाडीवरील अंमलदार व्ही.बी. पंडित व एन.एस तांबे हे युवकाच्या घरी पोहचले. त्यांनी खोलीचा दरवाजात तात्काळ तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा युवकाने गळफास घेतला होता. 

एका पोलिसांनी युवकास उचलुन धरले. दुसऱ्याने गळफास घेतलेली साडी कात्रीच्या सहाय्याने कापून काढली. फासावरुन खाली उतरल्यानंतर युवकाच्या छातीवर प्रेशर करीत त्यास शुद्धीवर आणले. तसेच १०८ गाडी बोलावुन घेत तात्काळ घाटी रुग्णालयातील आयसीयूत दाखल केले. गुरुवारी रात्रीपर्यंत युवक शुद्धीवर आलेला नव्हता. मात्र, उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली. स्पष्ट झाले. छावणीचे निरीक्षक शरद इंगळे, विशेष पथकाचे उपनिरीक्षक पांडुरंग डाके यांच्यासह अंमलदार पंडित व तांबे यांच्या प्रसंगावधानामुळे एका युवकाचा जीव वाचला आहे.

प्रेमप्रकरणातुन आत्महत्येचा प्रयत्न

युवकाने प्रेमप्रकरणातुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. युवकाच्या वडिलांना दुर्धर आजाराने निधन झालेले आहे. आई भांडे धुण्याचे काम करते. दुसरा एक भाऊ शिक्षण घेत असल्याची माहितीही छावणी पोलिसांनी दिली.

Web Title: due to the intervention of the police the youth who hanged himself was saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.