तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीउत्पन्न दुप्पट करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:53 AM2017-09-02T00:53:30+5:302017-09-02T00:53:30+5:30
शेतीचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतीचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने संकल्प ते सिध्दी कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
‘न्यू इंडिया मंथन - संकल्प ते सिध्दी’ या कार्यक्रमांतर्गत सदरील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर विजयअण्णा बोराडे, आ. नारायण कुचे, माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, आयसीएआर अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग, एन. ए. आर. पी. चे सहयोगी संचालक संशोधक डॉ. एस. बी. पवार, कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ. डब्ल्यू. एन. नारखेडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एस. व्ही. सोनुने उपस्थित होते.
गटशेतीचा अवलंब करावा, कमी पाण्यात, कमी खतात, कमी पैशांत अधिक उत्पन्न काढावे. शेतकºयांनी या संकल्पामध्ये सहभागी होऊन उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन खा. दानवे यांनी केले.
विजयअण्णा बोराडे म्हणाले की, शेतकºयांनी शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रगतशील तंत्राचा व निमकोटेड युरियाचा वापर करावा. डॉ. एस. बी. पवार यांनी सद्यस्थितीत येणाºया रबी पीक नियोजनासाठी तयारीला लागावे तसेच विद्यापीठाने विकसीत केलेल्या विविध वाणांचा वापर करुन अधिकाधिक उत्पन्न मिळवावे, असे आवाहन केले.
डॉ. सिंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मेळाव्यात शेती क्षेत्रात प्रगतशील काम करणाºया शेतकºयांना प्रशस्तीपत्र आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.