सर्रास पाणी उपशामुळे तलाव पडले कोरडेठाक

By Admin | Published: May 16, 2016 11:30 PM2016-05-16T23:30:53+5:302016-05-16T23:33:55+5:30

पाटोदा : तहसील आणि सिंचन प्रशासनाने तलावांतील पाणी वेळीच राखून ठेवले नाही. शिवाय पाणीचोरी पूर्ण क्षमतेने न रोखल्याने तलाव कोरडे पडले आहेत.

Due to the usual water rush, the pond fell | सर्रास पाणी उपशामुळे तलाव पडले कोरडेठाक

सर्रास पाणी उपशामुळे तलाव पडले कोरडेठाक

googlenewsNext

पाटोदा : तहसील आणि सिंचन प्रशासनाने तलावांतील पाणी वेळीच राखून ठेवले नाही. शिवाय पाणीचोरी पूर्ण क्षमतेने न रोखल्याने तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शहर पाणीपुरवठ्यासाठी टँकर लावण्याची वेळ नगरपंचायतीवर आली. पाणीसाठे राखून ठेवण्याबाबत लोकांनी मागणी करूनही दखल न घेतल्याने शासनाचा लाखो रूपये खर्च पाण्यात जात आहे.
पाटोदा न. पं. अंतर्गत गांधनवाडी, गीतेवाडी, बांगरवाडी, मंगेवाडी, बामदळेवाडी यासह शहरातील शिवाजीनगर, माऊलीनगर, क्रांतीनगर, जयसिंगनगर या ठिकाणी टँकर लावण्यात आले आहेत. शिवाजीनगर, माऊलीनगरसाठी स्वतंत्र नळयोजना आहे. या योजनेसाठीचा उद्भव बांगरवाडा तलाव आहे. हा तलाव कोरडाठाक पडला आहे. बामदळेवाडी, मंगेवाडी नळयोजनेसाठी मुंगेवाडी तलाव उद्भव आहे. हा तलावही कोरडाठाक पडला आहे. गांधनवाडी व पाटोदा शहरासाठी महासांगवी प्रकल्प उद्भव आहे. हे तिन्ही उद्भव कोरडे पडेपर्यंत पाणीउपसा सुरू होता.
गतवर्षी उपरोक्त तिनही तलाव ५०टक्क्यांपर्यंत भरले होते. पूर्ण क्षमतेने तलाव न भरल्यास पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे शासन आदेश आहेत. महासांगवी तलावातील गाळ काढलेला असल्याने साठवण क्षमता वाढलेली आहे. नागरिकांनी भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन पाणी राखून ठेवण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. याउलट पाणी उचलण्यासाठी परवानगी दिली गेली. शेतकऱ्यांनीही भरमसाठ उपसा केल्याने तलाव कोरडेठाक पडले.
आजघडीला शहराच्या पाणीपुरवठयावर प्रतिदिन ५० हजार रूपयांपेक्षा जास्तीचा खर्च होतो आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पाणी राखून ठेवण्याबाबत कळवले होते. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर तलाव कोरडे पडले नसते. याऊपरही आम्ही शहराला पाणी कमी पडू देणार नाहीत. नियोजन केले आहे, असे नगराध्यक्षा मनीषा पोटे म्हणाल्या. (वार्ताहर)

Web Title: Due to the usual water rush, the pond fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.