दुर्गा उत्सवास आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:07 AM2017-09-21T00:07:38+5:302017-09-21T00:07:38+5:30

गुुरुवारपासून सुरु होणाºया नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून जिल्ह्यात १५१८ दुर्गादेवींची स्थापना केली जाणार आहे़ नवरात्रोत्सवानि

Durga celebrations start today | दुर्गा उत्सवास आजपासून प्रारंभ

दुर्गा उत्सवास आजपासून प्रारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गुुरुवारपासून सुरु होणाºया नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून जिल्ह्यात १५१८ दुर्गादेवींची स्थापना केली जाणार आहे़
नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे़ गुरुवारी घटस्थापनेनंतर पुढील नऊ दिवस जिल्ह्यात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतो़ माहूर येथे रेणुकादेवी, दत्तशिखर, अनुसया माता मंदिर, देवदेवेश्वरी या ठिकाणी नवरात्र उत्सव काळात यात्रा भरते़ महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातून यात्रा काळात तब्बल सहा ते सात लाख भाविक दर्शनासाठी येतात़
तसेच लोहा तालुक्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माता रत्नेश्वरी या ठिकाणीही मोठ्या नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते़ येथील यात्रेतही दररोज जवळपास २० हजार भाविक दर्शनासाठी येतात़
दसºयानिमित्त नांदेड शहरात शीख बांधवाकडून हल्लाबोल व मातासाहिब गुरुद्वारा येथे जन्मोत्सव सोहळ्यासाठी देश-विदेशातील भाविकांची उपस्थिती होती़ त्याचबरोबर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून संचलनही करण्यात येते़
बौद्ध समाजाकडून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो़ त्यासाठी १७ ठिकाणी कॅन्डल मार्च काढण्यात येतो़ तर जिल्ह्यात २२ ठिकाणी रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ ३१ ठिकाणी मिरवणुका व १६ ठिकाणी बालाजी रथ निघणार आहे़ त्याचबरोबर नवरात्रोत्सवात सर्वांचे आकर्षण असलेल्या दांडीयासाठीही नियोजन करण्यात आले आहे़ एकुण ६५ ठिकाणी दांडीयाचे आयोजन केले आहे़
ग्रामीण भागात मोहरमनिमित्त ४९४ सवारी, ८९ ताजे, ३३५ पंजे, ५१ डोले, १८ नाल यांची स्थापना होवून १ आॅक्टोबर रोजी विर्सजन करण्यात येणार आहे़
या सर्व सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़ पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली २ अप्पर पोलिस अधीक्षक, ११ उपविभागीय अधिकारी, ४० पोलिस निरिक्षक, ११७ सपोनी, पोउपनी, २६६१ पोलिस कर्मचारी, २८४ महिला पोलिस कर्मचारी, ८ दंगा नियंत्रण प्लाटून, राज्य राखीव दलाच्या ३ प्लाटून, १०० पुरुष होमगार्ड, २०० महिला होमगार्ड आदी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत़

Web Title: Durga celebrations start today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.