नाकाबंदीत पोलिसांनी चोरीच्या दहा मोटारसायकल पकडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:02 AM2021-06-16T04:02:11+5:302021-06-16T04:02:11+5:30

वेदांतनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे, सहाय्यक निरीक्षक अनिल कंकाळ, हवालदार राहुल कांबळे, अमोल अंभोरे, प्रशांत नरोडे, अतुल ...

During the blockade, police seized ten stolen motorcycles | नाकाबंदीत पोलिसांनी चोरीच्या दहा मोटारसायकल पकडल्या

नाकाबंदीत पोलिसांनी चोरीच्या दहा मोटारसायकल पकडल्या

googlenewsNext

वेदांतनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे, सहाय्यक निरीक्षक अनिल कंकाळ, हवालदार राहुल कांबळे, अमोल अंभोरे, प्रशांत नरोडे, अतुल सोळुंके, बाळासाहेब ओवांडकर यांनी १३ जून रोजी रात्री संशयावरून आरोपी शेख रिझवान शेख करीम (२१, रा. हुसेन कॉलनी), ऋषिकेश बिसन जाधव (२३, रा. विशालनगर) यांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्याजवळील दुचाकीवर बनावट क्रमांक होता. उस्मानपुरा परिसरातून चाेरी झालेली ही दुचाकी असल्याचे निषन्न झाले. ठाण्यात नेवून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी क्रांतीचौक, सिडको, पुणे आणि अन्य दोन अशा पाच ठिकाणांहून चोरलेल्या आणखी पाच दुचाकी पोलिसांना काढून दिल्या. या आरोपींविरूद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला. यासोबतच पैठणरोड, केम्ब्रीज चौक आणि रांजणगांव फाटा येथे नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी चोरीच्या चार मोटारसायकल हस्तगत केल्या. आरोपीविरूद्ध एमआयडीसी पैठण, भोकरदन, सदर बाजार, जालना आणि अंबड पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे नोंद आहेत. या कारवाईत वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंके, सिडको वाहतूक विभागाचे निरीक्षक कैलास देशमाने, गुन्हे शाखेचे सपोनि. अजबसिंग जारवाल आणि पथकाने ही कारवाई केली.

Web Title: During the blockade, police seized ten stolen motorcycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.