पावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:14 PM2019-07-22T22:14:20+5:302019-07-22T22:14:36+5:30

औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव येथे भर पावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम असल्याचे चित्र आहे.

 During the monsoon, the demand for jar water remained constant | पावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम

पावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम

googlenewsNext

चितेपिंपळगाव : औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव येथे भर पावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम असल्याचे चित्र आहे.


उन्हाळा संपवुन दोन महिन्याचा कालावधी झाला असुन पावसाळ्यात चितेपिपळगाव परीसरात जार च्या पाण्याला अति महत्व प्राप्त झाले आहे या मध्ये पावसाळा सुरू होउन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्याने चांगला पाणीसाठा होऊ शकलेला नाही. मार्च-एप्रिलमध्ये शासनाने सुरु केलेले पाण्याचे टॅकर अजूनही सुरुच आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरवर अवलंबून राहावे लागत आहे.


ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वी सुरू केलेले फिल्टर प्लान्ट बंदावस्थेत आहे. यामध्ये ग्रामपंचायत १० रुपयांमध्ये २० लिटर पाणी असलेले एक जार देते होते. तर खाजगी व्यावसायिक २० रुपयांमध्ये एक जार देत आहेत. मात्र, आजारापासून दूर राहण्यासाठी ग्रामस्थ जारच्या पाण्यालाच प्राधान्य देत आहेत.

चितेपिंपळगाव परिसरात ४ ते ५ आरओ प्लांट आहेत, तर प्रिंपीराजामध्ये चार प्लांट आहेत. आगामी काळात चांगला पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Web Title:  During the monsoon, the demand for jar water remained constant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.