दसरा महोत्सवास यंदा रंग चढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:29 AM2017-09-25T00:29:23+5:302017-09-25T00:29:23+5:30

१६३ वर्षाची परंपरा असलेला व सर्वांचे आकर्षण असलेल्या दसरा महोत्सवात यावर्षी पहिल्यांदाच उद्घाटनाला विलंब झाला आहे. घटस्थापना होऊन पाचवा दिवस उलटले तरीही बैठकावर बैठकाच घेतल्या जात आहेत. झोक्यांसह इतर मनोरंजनाच्या बाबींची जुळवाजुळव रविवारी सुद्धा झालेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदा गर्दी ओसरली आहे.

Dussehra Festival | दसरा महोत्सवास यंदा रंग चढेना

दसरा महोत्सवास यंदा रंग चढेना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : १६३ वर्षाची परंपरा असलेला व सर्वांचे आकर्षण असलेल्या दसरा महोत्सवात यावर्षी पहिल्यांदाच उद्घाटनाला विलंब झाला आहे. घटस्थापना होऊन पाचवा दिवस उलटले तरीही बैठकावर बैठकाच घेतल्या जात आहेत. झोक्यांसह इतर मनोरंजनाच्या बाबींची जुळवाजुळव रविवारी सुद्धा झालेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदा गर्दी ओसरली आहे.
म्हैसूरनंतर हिंगोली येथील दसरा दुसºया क्रमांकाचा म्हणून प्रसिद्ध आहे. जवळपास दीडशे वर्षांची या महोत्सवाची परंपरा असलेल्या महोत्सवावर पहिल्यांदाच दिरंगाई येऊन ठेपली आहे. एकीकडे मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाºया आकर्षक दसरा महोत्सवातील साहित्याची जोडाजोड सुरु असताना मात्र तालुका स्तरावर दसरा सुरु होऊन पाचवा दिवस उजाडला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी दसरा पाहण्यास येणारी मंडळी तालुक्याच्या ठिकाणीच रमत आहे. विशेष म्हणजे अजूनही दसरा महोत्सवातील प्रदर्शन व सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे झोकेच सुरु झालेले नाहीत. मात्र समितीकडून बैठकावर बैठका घेतल्या जात आहेत. त्यात समितीचे प्रमुख असलेले अधिकारी बैठकांना येतही नाहीत. ज्यांनी दसºयाची परंपरा चालण्यासाठी कारभाराची धुरा आतापर्यंत खांद्यावर वाहिली त्यांना तेथे साधी किंमतही मिळत नसल्याने पाठ फिरविली आहे. त्यामुळे सुरूवातीपासूनच नियोजनावर पाणी फेरले गेले. उरले सुरले काम पावसाने आटोपले. त्यामुळे यंदाचा महोत्सव पुढील पाच दिवसांततरी पूर्ववत होईल की नाही, अशी चिंता आहे. कारण सध्या दांडियामुळे शहरवासिय या प्रदर्शनात येत नसल्याचे चित्र आहे. तर ग्रामीण भागातील लोकांना अजून दसºयात ती रंगतच दिसत नसल्याने त्यांनीही पाठ फिरविली.

Web Title: Dussehra Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.