दसरा प्रदर्शनात होणार प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:00 AM2017-09-30T00:00:22+5:302017-09-30T00:00:22+5:30

वसमत येथे दसºयाच्या दिवशी रावण दहन हे मुख्य आकर्षण असते. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातून हजारो महिला, नागरिक हजेरी लावतात. या उसळणाºया गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही गोंधळ होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

Dussera exhibition will be a huge crowd | दसरा प्रदर्शनात होणार प्रचंड गर्दी

दसरा प्रदर्शनात होणार प्रचंड गर्दी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत येथे दसºयाच्या दिवशी रावण दहन हे मुख्य आकर्षण असते. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातून हजारो महिला, नागरिक हजेरी लावतात. या उसळणाºया गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही गोंधळ होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. तर प्रदर्शनात स्टॉल वाल्यांकडून पिळवणूक होणार नाही, यासाठी दसरा कमेटीलाही दक्ष रहावे लागणार आहे.
वसमत येथे दरवर्षी रावण दहन कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीच्या गैरफायदा काही टारगट टोळके घेत असते. महिला व मुलींना छेडण्याचे प्रयत्नही होत असतात यावर्षी डीवायएसपी शशीकिरण काशिद व पोलीस निरीक्षक यांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने अद्यापपर्यंत असा प्रकार घडलेला नाही. पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीने टवाळखोरांच्या कारवाया बंदच झाल्या आहे. मुलींची व शाळकरी विद्यार्थिनींची छेड काढणाºयांची गर्दी सहन करणार नाही, अशी गर्जनाच चंदेल यांनी केल्याने महिला व मुलींनाही बळ मिळाले आहे. यावर्षी दुर्गा उत्साहात महिला व मुलींचा सहभागही वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. भरीस भर महिलांना शक्ती देण्याच्या उद्देशाने वसमत पोलिसांनी दुर्गा विसर्जनात शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला मंडळ, युवती मंडळ व दुर्गा मंडळाच्या महिला पदाधिकाºयांनाच बंदोेबस्ताची जबाबदारी देण्याची घोषणा झाल्याने यावर्षीचा दसरा महोत्सव एक अगळा वेगळा उत्सव ठरत आहे.
पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलीस बंदोबस्त चोख आहे. साध्या वेशातील महिला पोलीस कर्मचारी व पोलीस कर्मचाºयांची तैनाती राहणार आहे. प्रत्येक घडामोडीवर कॅमेºयाची नजर राहणार आहे. महिला व मुलींना मुक्त वातावरणात उत्सावाचा आनंद घेता यावा, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी सांगून वसमतमध्ये उत्सव शांततेत पार पडणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

Web Title: Dussera exhibition will be a huge crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.