अजिंठा ते फर्दापूर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:05 AM2021-04-24T04:05:01+5:302021-04-24T04:05:01+5:30

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांना जोडणाऱ्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे सिमेंटीकरण रस्त्याची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडली होती. आता हे काम करण्यासाठी अजिंठा ...

Dust kingdom on the road from Ajanta to Fardapur | अजिंठा ते फर्दापूर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

अजिंठा ते फर्दापूर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

googlenewsNext

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांना जोडणाऱ्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे सिमेंटीकरण रस्त्याची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडली होती. आता हे काम करण्यासाठी अजिंठा घाटापासून ते अजिंठा गावापर्यंतचा जुना डांबरी रस्ता खोदण्याचे काम रात्री-अपरात्रीही सुरू आहे. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे समोरून येणारे वाहन वाहनधारकांना दिसत नसून अपघाताची शक्यता वाढली आहे, याशिवाय धुळीमुळे श्वसनाचे आजार जडत आहेत.

चौकट

घाटात होणार डांबरी रस्ता

जळगाव-औरंगाबाद सिमेंट रस्त्याचे चौपदरीकरण काम मंजूर आहे. मात्र, अजिंठा घाटातील डोंगर कटाईचे काम जिकिरीचे असल्याने, घाट न फोडता घाटातील रस्ता आहे तसाच डांबरीकरण करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. असे झाल्यास हा रस्ता जास्त दिवस टिकणार नाही. घाटात डोंगरातील पाणी रस्त्यावर येत असल्याने, डांबरी रस्ता वारंवार उखडतो. किमान येथे सिमेंट रस्ता करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

चौकट

ठेकेदाराकडून पाण्याची बचत

पावसाळ्यापूर्वी राहिलेले काम उरकण्यासाठी व जलद काम करण्याच्या नादात ठेकेदार निकृष्ट काम करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यावर, डिवायडरच्या कामावर पाणी मारले जात नाही. अर्धवट असलेल्या कामाजवळ यामुळे धूळ उडत आहे.

फोटो कॅप्शन : अजिंठा गावाजवळ असलेल्या पुलाचे काम सुरू आहे. येथे उडणारे धुळीचे लोट.

230421\img-20210423-wa0355_1.jpg

अजिंठा गावाजवळ असलेल्या पुलाचे काम सुरू आहे येथे उडणारे धुळीचे लोट.

Web Title: Dust kingdom on the road from Ajanta to Fardapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.