बुधवारपासून उडणार धुरळा
By Admin | Published: September 30, 2014 01:15 AM2014-09-30T01:15:51+5:302014-09-30T01:30:59+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत उमेदवारांनी प्रचार सुरू केला असला, तरी प्रचाराचा धुरळा मात्र बुधवारपासून उडणाार आहे.
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत उमेदवारांनी प्रचार सुरू केला असला, तरी प्रचाराचा धुरळा मात्र बुधवारपासून उडणाार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १ आॅक्टोबर रोजी शहरात मुक्कामी येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आ. सतीश चव्हाण यांनी दिली. बुधवारी शरद पवार हे सायंकाळी ५ वाजता कन्नड येथे, तर सायंकाळी ७.३० वाजता फुलंब्री येथे सभा घेणार आहेत.
गुरुवारी सकाळी ११.३० वाजता त्यांची वैजापूर येथे जाहीर सभा होणार आहे. यामुळे बुधवारपासून मोठ्या सभा जिल्ह्यात सुरू होणार आहेत. प्रचारासाठी केवळ पंधरा दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने या कालावधीत जिल्ह्यात प्रचारसभांचा धडाका उडणार आहे. सध्या उमेदवारांचा पदयात्रा आणि विविध गावांत, तसेच घरोघरी जाऊन प्रचारावर भर आहे. आणखी दोन दिवस हेच वातावरण राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने जाहीर सभांचा धडाका सुरू होणार आहे.
राज ठाकरे यांची २ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत सभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मराठवाड्यातील पहिली जाहीर सभा येत्या २ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत होणार आहे.
जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता ही सभा होणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितले.