डस्टबिन खरेदीचे नियोजन बारगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:28 AM2017-08-25T00:28:42+5:302017-08-25T00:28:42+5:30

९० हजार डस्टबिन खरेदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, निविदा प्रक्रियेअभावी डस्टबिन खरेदीचे नियोजन बारगळले आहे.

 Dustin procurement planning resumes | डस्टबिन खरेदीचे नियोजन बारगळले

डस्टबिन खरेदीचे नियोजन बारगळले

googlenewsNext

बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील प्रत्येक कुटुंबाने आपला कचरा रस्त्यावर व इतरत्र कुठेही न टाकता थेट कुंडीत टाकावा यासाठी पालिकेने प्रत्येक कुटुंबाला दोन डस्टबिन देण्याचे ठरविले. त्यासाठी ९० हजार डस्टबिन खरेदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, निविदा प्रक्रियेअभावी डस्टबिन खरेदीचे नियोजन बारगळले आहे.
जालना शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न सध्या एैरवणीवर आहे. शहरात दररोज ८५ मेट्रिक टन कचरा निघतो. पैकी ६० टन कचरा उचलला जातो उर्वरित २५ मेट्रिक टन कचरा जागेवर पडून राहतो.
शहरातून उचलण्यात येणारा कचरा नगरपालिकेच्या मालकीच्या रोहनवाडी रस्त्यावरील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो. डंम्पिग ग्राऊंडवर ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे नियोजन नाही. घरातूनच ओला व सुका कचरा वेगळा करून तो घंटा गाड्यांच्या माध्यमातून डंपिंग ग्राऊंडवर टाकता यावा यासाठी पालिकेने प्रत्येक कुटुंबाला हिरव्या व निळ्या रंगाच्या दोन डस्टबीन देण्याचा ठराव घेतला.
याबरोबर घंटा गाड्या, कॉम्पेक्टर आदी अडीच कोटी रुपयांचे स्वच्छता साहित्य खरेदीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.
यातील घंटा गाड्यांची खरेदी करण्यात आली. मात्र, डस्टबीन खरेदला काही महिने उलटूनही मुहुर्त लागलेला नाही. डस्टबिन खरेदीसाठी आवश्यक निविदा प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही.
पालिकेच्या पदाधिकाºयांसह अधिकाºयांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. तांत्रिक अडचणींअभावी डस्टबीन खरेदीचे नियोजन सध्या तरी शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title:  Dustin procurement planning resumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.