वेरूळ शिवारात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:29 AM2018-02-22T01:29:26+5:302018-02-22T01:29:30+5:30
वेरुळसह पळसवाडी, बोरगाव शिवारात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. परिसरात बकºया, हरीण, काळवीट, गाय यांना फाडून खाल्याने बिबट्याची येथे दहशत निर्माण झाली आहे.
वेरूळ : वेरुळसह पळसवाडी, बोरगाव शिवारात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. परिसरात बकºया, हरीण, काळवीट, गाय यांना फाडून खाल्याने बिबट्याची येथे दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी वेरूळ शिवारातील गट क्रमांक ३५९ मधील युसूबखा इसाखा पठाण यांच्या शेतात बिबट्याने काळवीटचा फडशा पाडला. याची माहिती मिळताच माटेगावचे शिवनाथ शेळके, वेरूळचे पोलीस पाटील रमेश ढिवरे, सुनील इंगळे, अनिल मगर, सोमनाथ इंगळे, नारायण इंगळे आदींनी घटनास्थळी पाहणी केली. वनविभागाने परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.