ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:05 AM2021-09-18T04:05:32+5:302021-09-18T04:05:32+5:30
ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांकडे ॲण्ड्राॅईड मोबाईल नाही. ज्यांचेकडे आहे, त्यांना नेटवर्कची समस्या जाणवत आहे. तर जेथे रेंज आहे. तेथे ...
ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांकडे ॲण्ड्राॅईड मोबाईल नाही. ज्यांचेकडे आहे, त्यांना नेटवर्कची समस्या जाणवत आहे. तर जेथे रेंज आहे. तेथे ॲप डाऊनलोड करुन त्यात माहिती कशी भरायची याबाबत शेतकऱ्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ई पीक पाहणीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. ‘माझी शेती, माझा सातबारा, माझा पीकपेरा’ या घोषवाक्याच्या आधारे शासनाने सुरु केलेल्या या उपक्रमाची सुरुवात १५ ऑगस्टला करण्यात आली आहे. अनेक गावांत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ॲप वापराबाबत माहिती देण्यात आली. ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदविण्यासाठी ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख ठेवण्यात आली आहे.
कोट...
ई पीक ॲप वापरताना शेतकऱ्यांना खूपच अडचणी येत आहेत, तरी शासनाने ही माहिती ऑफलाईन भरुन घ्यावी. दुसरीकडे पीक पेरा नोंदविल्यानंतर मदत मिळणार नाही, असे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. अशावेळी प्रशासनाने मार्गदर्शन करावे.
विश्वंभर पवार, शेतकरी, केळगाव