प्रत्येक केव्हीके विविध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:05 AM2021-02-13T04:05:31+5:302021-02-13T04:05:31+5:30
डॉ. ए. के. सिंग : राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा ---- औरंगाबाद : प्रत्येक कृषी विज्ञान केंद्र हे ...
डॉ. ए. के. सिंग : राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा
----
औरंगाबाद : प्रत्येक कृषी विज्ञान केंद्र हे विविध तंत्रज्ञानाचे मॉडेल बनावे. त्यातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहून सर्व प्रकारची माहिती मिळवता येईल. तसेच कार्यक्षेत्रातील पाण्याची कमतरता ओळखून पाण्याच्या संवर्धनासंदर्भात कामे करणे गरजेचे आहे, असे मत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे कृषी विस्तार उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग यांनी व्यक्त केले.
अटारी, पुणे, औरंगाबाद १ येथील कृषी विज्ञान केंद्र, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन वार्षिक कृती आराखडा २०२१ ची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यशाळेत राज्य व गोव्याच्या ५१ केव्हीकेच्या वार्षिक कृती आराखड्याचे सादरीकरण झाले.
यावेळी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, डॉ. व्ही. एम. भाले, डॉ. एस. डी. सावंत, डॉ. लाखन सिंग, डॉ. ए. एम. पातुरकर, डॉ. पी. व्ही. चाहल, डॉ. रनधीर सिंग, डॉ. मेजर सिंग, डॉ. वाय. जी. प्रसाद, डॉ. इ. बी. चाकुरकर, डॉ. व्ही. एम. मानकर, डॉ. एस. जी. भावे आदींची उपस्थिती होती.
डॉ. अनिता जिंतुरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. डी. बी. देवसरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. किशोर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बस्वराज पिसुरे, प्रा. गीता यादव, अशोक निर्वळ, इरफान शेख, शिवा काजळे, विवेक पतंगे, सय्यद अमरीन आदींनी परिश्रम घेतले.