ईअर एण्ड आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:02 AM2020-12-31T04:02:01+5:302020-12-31T04:02:01+5:30

- जिल्ह्यात १५ मार्च रोजी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले आणि जगभरात धुमाकूळ घालणा-या कोरोनाचा औरंगाबादेत शिरकाव झाला. रशिया, ...

Ear and health | ईअर एण्ड आरोग्य

ईअर एण्ड आरोग्य

googlenewsNext

- जिल्ह्यात १५ मार्च रोजी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले आणि जगभरात धुमाकूळ घालणा-या कोरोनाचा औरंगाबादेत शिरकाव झाला. रशिया, कझाकिस्तानहून शहरात परतलेल्या प्राध्यापिका कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. या पहिल्या रुग्णानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आणि वर्ष सरेपर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४५ हजारांवर गेली.

२) जिल्हा रुग्णालय बनले कोविड रुग्णालय

-कोरोनामुळे चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय ३० मार्चपासून पूर्णपणे कोविड रुग्णालयात रुपांतरित झाले. बाह्यरूग्ण विभागासह अन्य रुग्णसेवा बंद करण्यात आली. गेल्या ९ महिन्यांपासून येथे केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. मनपातर्फे चिकलठाणा येथे कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले.

३)मराठवाड्यातील कोरोनाचा पहिला बळी.

- जिल्ह्यात ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मराठवाड्यात कोरोनाचा हा पहिला बळी ठरला होता. ५ एप्रिल ते १२ मे दरम्यान कोरोनामुळे एकूण १७ जणांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर १३ मे पासून कोरोनामुळे तब्बल ६ महिने प्रत्येक दिवस घातवार ठरत गेला. वर्षसंपेपर्यंत दुर्देवाने १ हजार १९८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

४) कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांचा मृत्यू.

- हजारो कोरोना रुग्णांसाठी दिवसरात्र एक करणार्या आरोग्य कर्मचारीही कोरोनाच्या तावडीत सापडले. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याचा २ जून रोजी मृत्यू झाला. जिल्ह्यात आरोग्य सेवेत कोरोनाचा पहिला बळी ठरला. त्यानंतर घाटीतील ४ कर्मचारी, खाजगी रुग्णालयातील डॉक्टराचाही कोरोनामुळे मृत्यू झाला.

५) कोरोना रुग्णाच्या आत्मत्येने खळबळ.

- घाटीत सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या चौथ्या मजल्यावरील आयसीयूत डॉक्टरांचा राऊंड सुरु असतानाच पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या कोरोना रुग्णाने खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २७ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेने आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

६)महिला निवासी डॉक्टरला चाकू दाखवून ओढून नेण्याचा प्रयत्न.

- घाटीतील वसतिगृहातून सुपर स्पेशालिटी ब्लॉककडे जाणार्या महिला निवासी डॉक्टरला चाकू दाखवून बाजूच्या झुडपात नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली. त्या दोघांनी महिलेचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरने आरडाओरड केल्याने दोघांनी पळ काढला. या घटनेनंतर घाटीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यावर भर देण्यात आला. पोलिसांनी नंतर आरोपीलाही जेरबंद केले.

७)कोरोना लसीकरणाची तयारी.

- जानेवारीत कोरोनाची लस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दृष्टीने डिसेंबरच्या प्रारंभीपासून आरोग्य यंत्रणेकडून लसीकरणाची तयारी सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

८) वर्ष सरताना नव्या कोरोना विषाणूचे संकट.

- नव्या वर्षात लस मिळण्याच्या संकेताना दिलासा मिळत नाही तोच ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराचे (स्ट्रेन)संकेट उभे राहिले. हा स्ट्रेन आढळलेल्यानंतर परदेशातून शहरात परतलेले २ जण कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. यात एक रुग्ण निगेटिव्ह होऊन घरीही गेला आहे.

Web Title: Ear and health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.