आता रात्री १० पर्यंत चालणार खवय्येगिरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:07 PM2020-10-08T12:07:58+5:302020-10-08T12:09:44+5:30
औरंगाबाद : शहर व परिसरातील हॉटेल्स आणि परमिटरूम ५ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. परंतू दोन दिवस रात्री ९ वाजेपुर्वीच हॉटेल बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यामुळे हॉटेल चालक संघटनेने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन वेळ वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संघटनेची विनंती मान्य केली असून रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहतील, अशी परवानगी दिली आहे. मद्यविक्रीची दुकाने मात्र रात्री ९ पूर्वीच बंद होतील. वेळेचे नियम पाळले जात आहेत की नाही, यासाठी कामगार उपायुक्त, अन्न व औषधी प्रशासन, सहआयुक्त, मनपा कर्मचाऱ्यांचे पथक असणार आहे. दरम्यान प्रत्येक हॉटेलचालकास कर्मचाऱ्यांची आरटीपीसीअर चाचणी करून घेणे बंधनकारक असणार आहे. यासाठी सर्व हॉटेलचालकांना ३ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
औरंगाबाद : शहर व परिसरातील हॉटेल्स आणि परमिटरूम ५ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. परंतू दोन दिवस रात्री ९ वाजेपुर्वीच हॉटेल बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यामुळे हॉटेल चालक संघटनेने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन वेळ वाढविण्याची मागणी केली होती.
त्यानुसार जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संघटनेची विनंती मान्य केली असून रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहतील, अशी परवानगी दिली आहे. मद्यविक्रीची दुकाने मात्र रात्री ९ पूर्वीच बंद होतील. वेळेचे नियम पाळले जात आहेत की नाही, यासाठी कामगार उपायुक्त, अन्न व औषधी प्रशासन, सहआयुक्त, मनपा कर्मचाऱ्यांचे पथक असणार आहे.
दरम्यान प्रत्येक हॉटेलचालकास कर्मचाऱ्यांची आरटीपीसीअर चाचणी करून घेणे बंधनकारक असणार आहे. यासाठी सर्व हॉटेलचालकांना ३ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.