कामकाजाला रिक्तपदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:16 AM2017-09-22T00:16:22+5:302017-09-22T00:16:22+5:30

मिनी मंत्रालय संबोधल्या जाणाºया जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने त्याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून ही रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडूनही कारवाई होत नसल्याचे पहावयास मिळत आहे.

Eclipse of vacancies in the workplace | कामकाजाला रिक्तपदांचे ग्रहण

कामकाजाला रिक्तपदांचे ग्रहण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मिनी मंत्रालय संबोधल्या जाणाºया जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने त्याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून ही रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडूनही कारवाई होत नसल्याचे पहावयास मिळत आहे.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कामकाजासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्याने व या तक्रारी थेट विधानसभा आणि विधानपरिषदेपर्यंत पोहचल्याने त्यांची ३१ आॅगस्ट रोजी पुणे येथे महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्प संचालकपदी बदली झाली. त्यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. त्यांचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रताप सवडे यांच्याकडे सोपविण्यात आला.
सवडे यांच्याकडे यापूर्वीच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा पदभार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे हे पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यावेळीपासून त्यांच्यापदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये प्रकल्प संचालक सवडे यांच्याकडे एकूण तीन पदभार आहेत.
प्रत्येक पदभारासंदर्भात वेगवेगळ्या बैठका विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी ठिकाणी होत असल्याने या बैठकांना हजर राहण्यासाठी ते बाहेरगावी जात आहेत. त्यामुळे १७ सप्टेंबरचा ध्वजारोहणाचा दिवस वगळता गेल्या ८ दिवसांपासून ते जिल्हा परिषदेत आलेलेच नाहीत. परिणामी स्वाक्षरीअभावी जि.प.तील अनेक फाईली प्रलंबित आहेत.
याशिवाय जि.प.तील लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे पद गेल्या चार ते पाच महिन्यांपासून रिक्त आहे. या पदाचा पदभार पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसूकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. असे असताना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गोवंदे हे दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांचा पदभारही वसूकर यांच्याकडेच आहे. वसूकर यांच्याकडे आता तीन विभागाचा पदभार असल्याने प्रत्येक विभागाच्या कामाला न्याय देणे त्यांना अवघड जात आहे. परिणामी तिन्ही विभागांच्या फाईली प्रलंबित राहत आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मेकाने यांची नांदेड येथे बदली झाल्याने त्यांचा पदभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खंदारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ.मेकाने यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचे कामही अनेक वेळा रेंगाळत आहे. रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने सत्ताधाºयांकडूनही फारसी हालचाल होताना दिसून येत नाही. जि.प.त राष्ट्रवादी- भाजपा सत्तेत आहे. रिक्त पदे भरण्याबाबत राष्ट्रवादीला भाजपाची मदत होणार आहे. परंतु, तसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. परिणामी विकासकामे ठप्प होत आहेत.

Web Title: Eclipse of vacancies in the workplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.