कापूस उत्पादक शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:08 AM2017-11-13T00:08:47+5:302017-11-13T00:08:51+5:30
नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत जगविलेल्या कापसाच्या पिकास वेचणीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. अव्वाच्या सव्वा मजुरी वाढविली असून कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतातून कापूस घरी कसा आणावा, याची चिंता शेतकºयांना लागली आहे. बाजारपेठेतही भाव मिळत नसल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत जगविलेल्या कापसाच्या पिकास वेचणीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. अव्वाच्या सव्वा मजुरी वाढविली असून कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतातून कापूस घरी कसा आणावा, याची चिंता शेतकºयांना लागली आहे. बाजारपेठेतही भाव मिळत नसल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
मानवत तालुक्यात कापसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी आर्थिक भार सहन करीत कापसाची लागवड केली. परंतु, लागवडीनंतर पावसाने दोन महिने पाठ फिरवली. अशा स्थितीमध्ये उपलब्ध पाण्यावर कापूस जगविला. पीक हातात येण्याअगोदर गुलाबी बोंड अळीने पिकावर हल्ला केल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यातच परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतकºयांच्या हाती एकरी ४ ते ५ क्विंटल कापूस पडला. बहुतांश शेतकºयांची कापसाची वेचणी शिल्लक आहे. कापूस उत्पादक शेतकरी मजुरांअभावी त्रस्त झाले आहेत. मजुरीचा दर सव्वाशे रुपयांचा २०० रुपयांवर जावून पोहचला आहे. तर कापूस वेचणीसाठी ७ ते ८ रुपये किलो दर द्यावे लागत आहेत. त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्चच अधिक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मजुरीसोबतच वाहनांची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. कापूस निघाल्यानंतरही बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकºयांची कोंडी झाली आहे. मजुरी, उत्पादन खर्च लक्षात घेता हाती कमी रक्कम पडत आहे. त्यामुळे आर्थिक गणिते कोलमडले आहेत.