कोरोना काळात खाद्यतेलाचा भडका; डाळीपाठोपाठ बेसनास महागाईचा जोरदार तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:57 PM2020-09-10T19:57:52+5:302020-09-10T19:59:28+5:30

कोरोनाशी लढतालढता आता सर्वसामान्य नागरिकांना महागाईशी दोन हात करावे लागत आहेत. 

Edible oil outbreaks during the Corona period; Inflation in gram flour followed by pulses | कोरोना काळात खाद्यतेलाचा भडका; डाळीपाठोपाठ बेसनास महागाईचा जोरदार तडका

कोरोना काळात खाद्यतेलाचा भडका; डाळीपाठोपाठ बेसनास महागाईचा जोरदार तडका

googlenewsNext
ठळक मुद्देमागील आठवडाभरात  लिटरमागे ५ ते ८ रुपयांपर्यंत खाद्यतेलाचे भाव वाढलेलॉकडाऊनमुळे आॅस्ट्रेलिया व टांझानिया येथून हरभऱ्याची आवक झाली नाही.

औरंगाबाद : जीवनावश्यक वस्तूंमध्ये महागाईने शिरकाव केला आहे. खाद्यतेलाच्या भावात भडका उडाला आहे. हरभरा डाळ आणि बेसनपिठाचे दरही वधारले आहेत. कोरोनाशी लढतालढता आता सर्वसामान्य नागरिकांना महागाईशी दोन हात करावे लागत आहेत. 

मागील आठवडाभरात  लिटरमागे ५ ते ८ रुपयांपर्यंत खाद्यतेलाचे भाव वाढले असले तरी मार्च महिन्याच्या तुलनेत  लिटरमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. मार्च महिन्यात ७८ ते १५० रुपये प्रतिलिटरदरम्यान विक्री होणारे खाद्यतेल सध्या ९० ते १६५ रुपयांनी विकले जात आहे.  सूर्यफूल तेल मागील ६ महिन्यांत ३० रुपयांनी कडाडून सध्या ११० रुपये लिटर विकत आहे. नवीन करडीची आवक फेब्रुवारी महिन्यात होईल. मात्र, सध्या ढेपीचे भाव गडगडल्याने करडी तेल महाग झाले. आॅक्टोबर महिन्यात नवीन सरकी, सोयाबीनची आवक सुरू होईल.

डाळीमध्ये सर्वाधिक हरभरा डाळ विकली जाते. लॉकडाऊनमुळे आॅस्ट्रेलिया व टांझानिया येथून हरभऱ्याची आवक झाली नाही. सरकारकडे मागील हंगामातील हरभरा डाळ मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, सार्वजनिक योजनेंतर्गत वितरणासाठी साठा ठेवण्यात आला आहे. यामुळे डाळ किलोमागे मागील आठवड्यात ५ रुपयांनी वधारली. जर लॉकडाऊनआधीचा विचार केल्यास हरभरा डाळीत १० रुपयांनी तेजी आली. परिणामी बेसनही ८ रुपयांनी वधारले. हरभरा डाळ ६४ ते ६६ रुपये, तर बेसन ८० ते ८४ रुपये विकले जात आहे. अन्य डाळींचे भाव स्थिर आहेत.


तुलनात्मक दर
खाद्यतेल     ३० मार्च  (प्रतिलिटर)    ९ सप्टेंबर
करडी तेल    १४५-१५० रुपये     १६०-१६५ रुपये
शेंगदाणा तेल    ११५-१२०      १४५-१५०
सरकी तेल    ८०     ९२
सोयाबीन तेल    ८०    ९२
पामतेल    ७८      ९०
सूर्यफूल तेल    ८०    ११०
वनस्पती तूप     ६८    ९० 
हरभरा डाळ    ५४-५६    ६४-६६
बेसन     ७४-७६     ८०-८४ 
 

Web Title: Edible oil outbreaks during the Corona period; Inflation in gram flour followed by pulses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.