एज्युकेशन फेअर.... नो कनफ्युजन....

By Admin | Published: May 25, 2016 11:58 PM2016-05-25T23:58:17+5:302016-05-26T00:06:01+5:30

औरंगाबाद : बारावीचा नुकताच निकाल लागलेला आहे. काही जणांना काय करायचे ते पक्के ठाऊक असले तरीही कोणता कोर्स कुठून करावा, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

Education Fair ... No Confusion .... | एज्युकेशन फेअर.... नो कनफ्युजन....

एज्युकेशन फेअर.... नो कनफ्युजन....

googlenewsNext

औरंगाबाद : बारावीचा नुकताच निकाल लागलेला आहे. काही जणांना काय करायचे ते पक्के ठाऊक असले तरीही कोणता कोर्स कुठून करावा, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अनेकांना नेमके काय करावे, हे अजूनही सूचत नाही. तुमच्या मनात निर्माण झालेल्या या संशयकल्लोळाला आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. कारण शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत’ समूहातर्फे यंदाही अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर अर्थातच भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ ते ३० मे २०१६ या काळात तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार येथे हे प्रदर्शन असणार आहे.
केवळ बारावीच नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांना अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर फायद्याचे ठरणार आहे. यामधून आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपसूकच मिळतील. महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्कि टेक्ट, फॅशन, ग्राफिक्स, इंटिरिअर डिझायनिंग व रिटेल, आयटीआय, अ‍ॅव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंतची माहिती येथे मिळेल. तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेजेस, स्पोकन इंग्लिश, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. यामुळे अवघे शिक्षणक्षेत्र एकाच छताखाली अवतरणार, हे निश्चित.
शिक्षण संस्थांसाठी हे प्रदर्शन सुवर्णसंधी ठरणार आहे. कारण याद्वारे हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती एकाच वेळी पोहोचवणे शक्य होणार आहे. प्रत्येकाशी संवाद साधून व्यावसायिकांना आपल्या संस्थेविषयी माहिती देता येईल. यानिमित्ताने एक नवाच वर्ग आपल्याशी जोडला जाईल.
हीरो मोटो कॉर्प हे या प्रदर्शनाचे पॉवर्ड बाय स्पॉन्सरर्स आहेत, तर दि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड व के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे प्रदर्शनाचे असोसिएट स्पॉन्सरर्स आहेत. आऊटडोअर पार्टनर अभिषेक अ‍ॅडव्हरटायजर्स आहेत.

Web Title: Education Fair ... No Confusion ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.