शिक्षणाधिकारी कडूस बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:01 AM2017-08-05T01:01:02+5:302017-08-05T01:01:02+5:30

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना तिसºया अपत्यामुळे नोकरी गमवावी लागली.

 Education Officer Kadus Badtorf | शिक्षणाधिकारी कडूस बडतर्फ

शिक्षणाधिकारी कडूस बडतर्फ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना तिसºया अपत्यामुळे नोकरी गमवावी लागली. शासनाने आज शुक्रवारी त्यांना तडकाफडकी बडतर्फ केले.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस हे अहमदनगर येथून बदलीने औरंगाबाद जिल्हा परिषदेत २६ जुलै रोजी रुजू झाले. जिल्ह्यातील प्राथमिक विभागाची संपूर्ण माहिती घेण्यापूर्वीच बरोबर दहाव्या दिवशी त्यांच्यावर बडतर्फीची कुºहाड कोसळली. बडतर्फीचा आदेश मिळताच ते तातडीने दुपारीच मुंबईकडे रवाना झाले. यासंदर्भात त्यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क होऊ शकला नाही.
२००५ पासून शासन नियमानुसार शासकीय सेवेत रुजू होताना दोनपेक्षा अधिक अपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. तथापि, अशोक कडूस यांना तीन अपत्ये होती. ते २०१३ च्या बॅचचे शिक्षणाधिकारी आहेत. तेव्हा त्यांनी आपणास दोन अपत्ये असून, एक अपत्य हे दुसºयाला दत्तक म्हणून दिलेले आहे, असे प्रतिज्ञापत्र दिले होते. यासंदर्भात शासनस्तरावर चौकशी सुरू होती. दरम्यान, आज जवळपास १२.३० वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयात बसलेले असतानाच त्यांना शासनाने बडतर्फीचा निर्णय घेतल्याची माहिती समजली. तेव्हा ते कोणालाही काही न सांगता जिल्हा परिषदेतूनच थेट मुंबईला रवाना झाले.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केली असता ते म्हणाले की, शिक्षकांच्या बदल्यांसंबंधी माहिती विचारण्यासाठी आपण शिक्षणाधिकारी कडूस यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचा संपर्क होत नव्हता.
शेवटी शिक्षण विभागातील कर्मचाºयांना कडूस कुठे आहेत, अशी विचारणा केली तेव्हा शासनाने त्यांना बडतर्फ केले असून ते मुंबईला गेले असल्याची माहिती मिळाली. परंतु त्यांनी मुख्यालय सोडताना किमान कल्पना तरी द्यायला पाहिजे होती. ते कोणालाही न सांगता बाहेरगावी निघून गेले आहेत. त्यांच्या या कृतीबद्दल आपण त्यांना नोटीस बजावणार आहे.

Web Title:  Education Officer Kadus Badtorf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.