‘लालपरी’मुळेच शिक्षण, ‘एसटी’चा अभिमान अन् उपकार; लोको पायलट कल्पना धनावत भावूक
By संतोष हिरेमठ | Published: January 3, 2024 12:24 PM2024-01-03T12:24:05+5:302024-01-03T12:29:24+5:30
‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे सारथ्य करणाऱ्या मराठवाड्याच्या लेकीचा ‘एसटी’तर्फे सत्कार
छत्रपती संभाजीनगर : ‘लाल परी’चा आम्हाला खूप अभिमान आहे. या ‘लाल परी’च्या नोकरीमुळेच आम्हाला शिक्षण घेता आले. या यशात एसटी महामंडळाचे मोठे उपकार आहेत, अशी भावना वंदे भारत एक्स्प्रेसचे सारथ्य करणाऱ्या कल्पना धनावत म्हणाल्या.
एसटी महामंडळातील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक मदनसिंग धनावत व त्यांची कन्या असिस्टंट लोकोपायलट कल्पना धनावत यांचा मंगळवारी विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विधी अधिकारी अविनाश पाईकडे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी अंबादास घोडके, कामगार अधिकारी विनायक आंबट, विभागीय अधीक्षक स्वाती घोडे, वाहतूक पर्यवेक्षक उषा मेहेत्रे, आस्थापना पर्यवेक्षक सुभाष गायकवाड, बाबासाहेब साळुंके, इम्रान जिलानी, राजाराम डेडवाल, योगेश डेडवाल, राजेंद्र वहाटुळे, अभिजित सूर्यवंशी, किशोर ढेपले, सय्यद मुक्तार, राजेश मोटे, रश्मी वैद्य, शीला मुळे आदी उपस्थित होते. संचालन नवनाथ बोडखे यांनी केले.