पुण्यात १७, १८ फेब्रुवारी रोजी शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:06 AM2021-02-16T04:06:41+5:302021-02-16T04:06:41+5:30
स्टार्स प्रकल्पासह प्रत्यक्ष सुरू झालेल्या वर्गांबाबत होणार चर्चा ---- औरंगाबाद : पुण्यात राज्यस्तरीय बैठक १७, १८ फेब्रुवारीला होत आहे. ...
स्टार्स प्रकल्पासह प्रत्यक्ष सुरू झालेल्या वर्गांबाबत होणार चर्चा
----
औरंगाबाद : पुण्यात राज्यस्तरीय बैठक १७, १८ फेब्रुवारीला होत आहे. या बैठकीत शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्यासह सर्व शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार असून, स्टार्स प्रकल्पासह सुरू झालेल्या व अद्याप प्रत्यक्ष वर्ग सुरू न झालेल्या शाळांबाबत चर्चा होणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या शिक्षण विभागाचा आढावा घेणार होत्या; मात्र त्या अपरिहार्य कारणास्तव येऊ न शकल्याने सोमवारी नियोजित आढावा बैठक रद्द झाली. यावेळी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या कार्यालयात रांगोळी, बॅनर लावून त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. प्राधिकरणाचे विभागीय संचालक डाॅ. सुभाष कांबळे म्हणाले की, शिक्षणमंत्र्यांचा नियोजित दौरा रात्री उशिरा रद्द झाल्याने बैठकही रद्द झाली. पुण्यात शिक्षण विभागाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्यस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सहा राज्यांची निवड केली आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून शिक्षण पद्धतीने अध्यापन, अध्ययन आणि परिणाम असा स्टार्स नावाने बळकटीकरण देणारा प्रकल्प राबवण्याबाबत या बैठकीत चर्चा होईल.