जालना स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:45 AM2017-10-08T00:45:44+5:302017-10-08T00:45:44+5:30
जालना स्मार्ट सिटी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहर हे सुंदर शहर बनवून मराठवाड्यातील एक आदर्श शहर करण्याकरिता शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिकांचे सहकार्य घेऊन आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार. जालना स्मार्ट सिटी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे केले.
शहरात नागरिकांनी सुचविलेल्या विकासाच्या सर्व सूचना स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याकरीता शहरातील समस्या, अडीअडचणी जाणून घेणेसाठी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी रितेश मिश्रा, किशोर अग्रवाल, अर्जुन गेही, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, पुसाराम मुंदडा, अविनाश देशपांडे यांच्यासह शहरातील व्यापारी, उद्योजक, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
यावेळी खा. दानवे म्हणाले, शहरातील अंडर ग्राऊंड ड्रेनेज करिता ७० कोटी, पाणीपुरवठा योजनेसाठी १३८ कोटी, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ४५ कोटी, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान सुशोभीकरणासाठी ११ कोटी व पर्यटन अंतर्गत नागेवाडी येथील बुद्ध विहार व शिवाजी पुतळा येथील गणेश भवन या तीर्थक्षेत्राच्या विकास कामांसाठी ३ कोटी तसेच ड्रायपोर्ट विकास कामांकरिता शेकडो कोटी निधी आपण आणलेला आहे. यापुढेही शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही व जालना शहर स्मार्ट सिटी म्हणून बनवण्याचा प्रत्यन राहील , असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित नागरिकांनी शहरातील विविध विकास कामांच्या मागण्या खा.दानवे यांच्याकडे मांडल्या.
१६ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मागण्यांचे निवेदन देऊन त्या पूर्ण करण्याकरीता स्वत: पाठपुरावा करू ,असे आश्वासन दानवे यांनी दिले.
यावेळी बंडू मिश्रीकोटकर, सतीश पंच, हस्तीमल बंब, सुखदेव बजाज, एस.व्ही.देशपांडे, संजय मुथा, विनीत साहनी, अभय नानावटी, संजय अग्रवाल, समीर अग्रवाल, अभय करवा, प्राचार्य जवाहर काबरा, अतुल लड्डा, पुरूषोत्तम मोतीवाला, डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ.अंबेकर, अॅड. किशोर राऊत, हेमंत ठक्कर, भावेश पटेल, सुदेश सकलेचा, अशोक पांगारकर, बन्सीधर आटोळे, मसूद कुरेशी आदींची उपस्थिती होती.