आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:36 PM2019-08-30T23:36:11+5:302019-08-30T23:36:37+5:30
वाळूज येथे साडे पाचकोटी रुपर्य रुपये खर्च करुन उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
वाळूज महानगर : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न सुरु आहे. वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरएसटीसीमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
वाळूज येथे साडे पाचकोटी रुपर्य रुपये खर्च करुन उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी क्लस्टरमधून वाळूज परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. चंद्रकांत खैरे, जि.प.अध्यक्षा देवयाणी डोणगावकर, आ. संजय शिरसाठ, जि.प.सदस्य रामदास परोडकर, सरपंच पपीनकुमार माने, सभापती ज्योती गायकवाड, माजी सभापती मनोज जैस्वाल, मंजुषा जैस्वाल, आरोग्य उपसंचालक डॉ.स्वप्निल लाळे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गिते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश घोडके, उपजिल्हा प्रमुख कृष्णा पा.डोणगावकर, उपस्थित होते.
डोणगावकर म्हणाल्या की, वॉटर ग्रीडच्या माध्यमातून गंगापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली काढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. वाळूजच्या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी व इतर सुविधाही लवकरच उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. याच बरोबर जोगेश्वरीत नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डोणगावकर यांनी सांगितले.
या प्रसंगी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.दत्तात्र्य घोलप, डॉ.सुंदर कुलकर्णी, डॉ.लड्डा, डॉ.गायकवाड, ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे, सदस्य सचिन काकडे, नंदकुमार राऊत, चेअरमन सर्जेराव भोंड, ज्ञानेश्वर देसाई, उत्तम बनकर, अविनाश गायकवाड, लताताई ईले, पद्माबाई गवांदे, पोपट बनकर, अनिल साळवे, हापीज पटेल, मुकेश बोहरा, अमोल लहकरे, काकासाहेब चापे, पारसचंद साकला, प्रवीण दुबिले आदींची उपस्थिती होती.