ईद उत्साहात; पाऊस, शांततेसाठी प्रार्थना

By Admin | Published: July 8, 2016 12:17 AM2016-07-08T00:17:53+5:302016-07-08T00:35:20+5:30

उस्मानाबाद : शहरासह जिल्हाभरात गुरूवारी मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी सामुहिक नमाज अदा करण्यात आली

Eid excited; Rain, prayer for peace | ईद उत्साहात; पाऊस, शांततेसाठी प्रार्थना

ईद उत्साहात; पाऊस, शांततेसाठी प्रार्थना

googlenewsNext


उस्मानाबाद : शहरासह जिल्हाभरात गुरूवारी मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी सामुहिक नमाज अदा करण्यात आली. यानंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
उस्मानाबाद येथील ईदगाह मैदानावर सकाळी सामुहिक नमाज अदा करण्यात आली. यात शेकडो समाजबांधव उपस्थित होते. नमाज अदा केल्यानंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील, रा. प. महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, आ. राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष संपत डोके, अमोल पाटोदेकर, माजी आ. ओम राजेनिंबाळकर, विश्वासराव शिंदे, सुरेश देशमुख, संजय पाटील दुधगावकर यांच्यासह इतर विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीनेही पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक दीपाली घाडगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर दिवसभर मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शुरखुर्मा व गुलगुल्यांचा आस्वाद घेतला.
परंडा शहरातील ईदगाह मैदानावर शहर काझी जफर मौलाना यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक नमाज पार पडली. यावेळी मौलाना जफर काझी यांनी रमजान ईदचे महत्व सांगितले. नमाज झाल्यानंतर मौलाना जफर काझी यांनी जगात व देशात शांतता नांदावी, भाईचारा वाढावा, सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, मुबलक पाऊस पडावा अशी प्रार्थना अल्लाहकडे केली.
यानंतर मुस्लिम बांधवाना पोलिसांच्या वतीने पो.नि.डंबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलाब पुष्प देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नायब तहसीलदार गणेश पवार, जुल्फेकार काझी, समीर पठाण, हाजी नुरुद्दीन चौधरी, जमील शेख, गौसोद्दीन काझी आदी उपस्थित होते. ईदनिमित्त हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देवून एकमेकांना गळा भेटी दिल्या.
उमरगा शहरातही रमजान ईद हा सण उत्साहात पार पडला. यानिमित्त शहरातील गुंजोटी रोडवरील ईदगाह मैदानावर हजारो बांधवांनी ईदची नमाज अदा केली. बुधवारी संध्याकाळी ईदचा चाँद दिसल्यानंतर उमरगा शहरात मुस्लीम बांधवानी खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली होती. नमाज अदा करून आलेल्या मुस्लिम बांधवाना ईदगाह मैदानाबाहेर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा बँकेचे चेअरमेन सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष संजय पवार, सुनील माने, बालाजी पाटील, आमोल पाटील, बापू बिराजदार तसेच शिवसेनेच्या वतीने युवा नेते किरण गायकवाड, नगराध्यक्ष धनंजय मुसांडे, नगरसेवक नारायण सुरवसे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक रझाक अत्तार आदी उपस्थित होते. वाशी येथे तांदुळवाडी रोडवरील ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा करण्यात आली. भूम शहरातील वाशी रोडवर ील ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पार पडली. या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Eid excited; Rain, prayer for peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.