जिल्ह्यात ईद-उल-फित्र उत्साहात
By Admin | Published: July 19, 2015 12:40 AM2015-07-19T00:40:35+5:302015-07-19T00:57:24+5:30
जालना : जिल्ह्यात मुस्लिम समाजबांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सांगता शनिवारी सर्वत्र ईद-उल-फित्र साजरी झाली. यानिमित्ताने ठिकठिकाणचे ईदगाह मैदान व मशिदींमध्ये
जालना : जिल्ह्यात मुस्लिम समाजबांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सांगता शनिवारी सर्वत्र ईद-उल-फित्र साजरी झाली. यानिमित्ताने ठिकठिकाणचे ईदगाह मैदान व मशिदींमध्ये नमाज अदा करून पावसासाठी सामुहिक प्रार्थना करण्यात आली.
जुना जालना ईदगाहमध्ये मुफ्ती अब्दूल रहेमान यांनी नमाज पठण केले. पावसासाठी तसेच देशाच्या उन्नतीसाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. तत्पूर्वी एकबाल पाशा, मौलाना गुफरान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वधर्म समभाव, शांतता व भाईचाऱ्याचा संदेश देऊन इस्लाम शांतीचा धर्म आहे, मुस्लिम बांधवांनी पैगंबर मोहम्मद यांच्या तत्वाचे पालन करावे, असे आवाहन केले.
यावेळी आ. अर्जुनराव खोतकर, माजी खासदार अंकुशराव टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपविभागीय अधिकारी श्रीकांत चिंचकर, तहसीलदार रेवननाथ लबडे, बाबूराव सतकर, पंडितराव भुतेकर आदींनी मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिली.
याप्रसंगी मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, डॉ. मोहम्मद बद्रोद्दीन, काँग्रेस शहराध्यक्ष अब्दूल हाफिज, सत्संग मुंढे, राम सतकर, गणेश सुपारकर, मोहन इंगळे, अय्यूब खान, अॅड. अर्शद बागवान, अॅड. सोहेल सिद्धीकी, मोहम्मद इफ्तेखारोद्दीन तय्यब देशमुख, नवाब डांगे, अहेमद नूर, शेख महेमूद, बदर चाऊस, फेरोज मौलाना, लतीफ कादरी आदींची उपस्थिती होती. नवीन जालन्यात सदर बाजार ईदगाहमध्ये सामुहिक नमाज अदा करण्यात आली. काजी मोईनोद्दीन यांनी नमाज पठण केले. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, गणेश राऊत, विनीत साहनी, नंदू जांगडे, नूरखान, आलमखान पठाण, जहीर सौदागर आदी उपस्थित होते.
गांधीनगर ईदगाहमध्ये मौलाना नद्वी जब्बार यांनी नमाज पठण केले. यावेळी अकबरखान, नगरसेवक शेख आरेफ, सरपंच राऊफ, शेख करीम, अमीनोद्दीन, गुलाम यशदानी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुक्तेश्वर प्रवेशद्वार येथे रामभाऊ सतकर व गणेश सुपारकर यांच्या वतीने केशरी दुधाचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यात सुमारे महिनाभरापासून पाऊस गायब झालेला आहे. पावसाअभावी पिके करपून जात आहेत. त्यामुळे पाऊस पडावा, यासाठी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी मशिदींमध्ये तसेच ईदगाह मैदानावर सामूहिक प्रार्थना करण्यात आली. सर्वधर्म समभाव हा संदेशही प्रत्येक मशिदींमध्ये मौलानांनी दिला.