२४ तासांत आठ दलघमी साठा

By Admin | Published: September 3, 2016 12:11 AM2016-09-03T00:11:17+5:302016-09-03T00:30:58+5:30

बीड : एक महिना दडी मारून बसलेला पाऊस चार दिवसांपासून तुरळक ठिकाणी बरसत आहे. माजलगाव धरणात गेल्या २४ तासांत ८ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला

Eight colonial stocks in 24 hours | २४ तासांत आठ दलघमी साठा

२४ तासांत आठ दलघमी साठा

googlenewsNext


बीड : एक महिना दडी मारून बसलेला पाऊस चार दिवसांपासून तुरळक ठिकाणी बरसत आहे. माजलगाव धरणात गेल्या २४ तासांत ८ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला असल्याचे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात एकूण १४४ सिंचन प्रकल्प असून, ११३६.९४ द.ल.घ.मी. एवढी त्यांची साठवण क्षमता आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरीदेखील धरणे कोरडीठाक आहेत. १४४ प्रकल्पांत माजलगाव व मांजरा या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. माजलगाव धरणात २४ तासांत ८ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला असून, सद्य:स्थितीत एकूण ८७ द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे, मांजरा प्रकल्पात पाण्याचा टिपूसही दिसत नाही.
जिल्ह्यातील पावसाची सद्य:स्थिती
मागील २४ तासांत झालेला पाऊस (कंसात आतापर्यंतचा पाऊस): बीड-४.४ (२८७.१), पाटोदा- १.३ (३६८.८), आष्टी- ०.० (३०७.७), गेवराई- ११.३ (३६१.४), शिरूर- ७.० (३१२.३), वडवणी- १७.५ (४९७.३), अंबाजोगाई-६.४ (४१८.०), माजलगाव- २२.० (५२९.४), केज- ४.० (३६२.९), धारूर- २.० (३१३.३), परळी- १९.८ (३६१.४). (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यात एकूण १४४ प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पात बीड विभागात ४, तर परळी विभागात ६ प्रकल्प असून, यामध्ये १२.५९ द.ल.घ.मी. एवढा उपयुक्त पाणी साठा आहे.
४लघु प्रकल्पांमध्ये जिल्ह्यात एकूण ९९ प्रकल्प आहेत. यामध्ये बीड विभागात ४६, तर परळी विभागात ५३ प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये १३.६३ द.ल.घ.मी. एवढा उपयुक्त पाणी साठा असल्याचे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या साप्ताहिक पाणी साठा गोषवारा अहवालात म्हटले आहे.
४जिल्ह्यात आजघडीला एकूण ३.८८ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह नागरिकांना लागली आहे.

Web Title: Eight colonial stocks in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.