उपलब्ध आठ लाख लिटर; गरज ४ लाखांची; तरीही कायम टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:36 PM2018-12-03T22:36:29+5:302018-12-03T22:37:11+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेच्या माध्यमातून दररोज तब्बल ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. विद्यापीठ परिसरातील विभागांमध्ये जवळपास ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुले आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये १८०० विद्यार्थी वास्तव्याला आहेत. या सर्वांना दररोज ४ लाख लिटरपेक्षा कमी पाणी लागते.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेच्या माध्यमातून दररोज तब्बल ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. विद्यापीठ परिसरातील विभागांमध्ये जवळपास ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुले आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये १८०० विद्यार्थी वास्तव्याला आहेत. या सर्वांना दररोज ४ लाख लिटरपेक्षा कमी पाणी लागते. ८ लाख लिटर पाणी उपलब्ध असताना गरजेचे ४ लाख लिटर वजा केले, तर उरलेले ४ लाख लिटर पाणी कुठे मुरते, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
विद्यापीठातील विविध विभाग, वसतिगृहे आणि प्रशासकीय इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहांमध्ये पाणीटंचाईचा प्रकार वारंवार घडतो आहे. विद्यापीठातील पाण्याची उपलब्धता मोठी आहे. हे पाणी वसतिगृहे, विभागांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये दररोज भरले जाते; मात्र वापर आणि पाण्याच्या चोरीवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आली. विद्यापीठातील विभागांमध्ये ५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील १८०० विद्यार्थी (कागदोपत्री) वसतिगृहात राहतात. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १३५ लिटर पाणी प्रतिदिन दिले पाहिजे, असा नियम आहे. यानुसार १८०० विद्यार्थ्यांना २ लाख ४३ हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे, तर विभागांमध्ये शिक्षण घेणाºया ५ हजार विद्यार्थ्यांना पिण्याचे आणि विभागातील स्वच्छतागृहांसाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. अशी ४ लाख लिटर पाण्याची विद्यापीठात गरज असल्याची माहिती स्थावर विभागाच्या अधिकाºयांनी दिली; मात्र विद्यापीठातील १८ विहिरी, १४ कुपनलिका आणि महापालिकेद्वारे दररोज ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. ही आकडेवारी वसतिगृह, विभाग आणि प्रशासकीय इमारतींमधील पाणी साठवण टाक्यांमध्ये टाकण्यात येणाºया दररोजच्या नोंदीवरून काढलेली आहे.
नासाडीसह चोरी थांबविण्याची आवश्यकता
वसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात येते; मात्र या वसतिगृहांमध्ये उपलब्ध पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात येते. मनसोक्त आंघोळ करणे, स्वच्छतागृहांसाठी आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचा वापर केल्यामुळेही पाण्याच्या टाक्या तात्काळ रिकाम्या होतात. याशिवाय विविध वसतिगृहांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होते. विद्यापीठाशेजारील परिसरात राहणारे विद्यार्थी, रहिवासी पिण्याचे पाणी जारमध्ये भरून घेऊन जात असल्याचेही निदर्शनास आले. वसतिगृहात न राहणारे विद्यार्थीही सकाळी वसतिगृहातील मित्रांकडे येऊन आंघोळी करून जातात, असेही विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, तसेच वसतिगृहात कागदोपत्री असलेल्या आकडेवारीपेक्षा तिप्पट विद्यार्थी वास्तव्याला असल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले.
नियंत्रण कोण ठेवणार
विद्यापीठातील वसतिगृहे, विभागांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्थावर मालमत्ता विभागाची आहे. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी वसतिगृहे, विभागांमधील पाण्याच्या टाक्या भरून देतात; मात्र त्या टाक्या तात्काळ रिकाम्या होतात. यामुळे प्रत्यक्ष वापर करणाºया पाण्याची काटकसर, चोरीला जाणारे पाणी थांबविणे आणि अतिरिक्त वसतिगृहात येणारे आणि राहणाºया विद्यार्थ्यांना कोण अडवणार? असा प्रश्न उपस्थित झाला असल्याचेही स्थावर विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
पाण्याची उपलब्धता
१८ विहिरी आणि १४ कूपनलिका- ६ लाख लिटर पेक्षा अधिक
महापालिकेचा जलकुंभ - २ लाख लिटर (एक दिवसाआड)
पाण्याची गरज - प्रतिविद्यार्थी १३५ लिटर (वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी)
उपलब्धता आठ लाख लिटर; आवश्यकता ४ लाखांची; तरीही कायम टंचाई (जोड) कु ल शब्द(52)
उपलब्धता आठ लाख लिटर; आवश्यकता ४ लाखांची; तरीही कायम टंचाई (जोड)
पाण्याची सतत टंचाई होत असल्यामुळे बैठक घेऊन आढावा घेतला. विद्यापीठात पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. विविध विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेकडून मिळणारे पाणी पुरेसे असल्याचे दिसून आले. पाण्याच्या अतिवापरासह समन्वयाचा अभाव दिसून आला. विद्यापीठाने एक स्वतंत्र अतिरिक्त टँकर खरेदी केले आहे. जेथे पाणी कमी पडेल, तेथे पाणी दिले जाईल.
- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू