पाथरी ठाण्यातील आठ पोलीस कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:24 AM2017-11-15T00:24:07+5:302017-11-15T00:24:21+5:30

येथील पोलीस ठाण्यातील आठ कर्मचाºयांना बदलीच्या ठिकाणी नुकतेच कार्यमुक्त करण्यात आले. ६ महिन्यांपूर्वी बदलीचे आदेश निघूनही हे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी न जाता पाथरी येथेच कार्यरत होते.

Eight police workers from Thathi Thane | पाथरी ठाण्यातील आठ पोलीस कार्यमुक्त

पाथरी ठाण्यातील आठ पोलीस कार्यमुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : येथील पोलीस ठाण्यातील आठ कर्मचाºयांना बदलीच्या ठिकाणी नुकतेच कार्यमुक्त करण्यात आले. ६ महिन्यांपूर्वी बदलीचे आदेश निघूनही हे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी न जाता पाथरी येथेच कार्यरत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून एप्रिल- मे २०१७ या महिन्यात पोलीस कर्मचाºयांच्या पदोन्नती, बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. पाथरी पोलीस ठाण्यातील ९ पोलीस कर्मचाºयांची जिल्ह्यात इतरत्र बदली करण्यात आली होती. यातील एक पोलीस कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाला होता. तर ८ कर्मचाºयांनी पाथरी पोलीस ठाणे सोडले नव्हते.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने बदली झालेल्या आणि ठाणे न सोडलेल्या कर्मचाºयांचे वेतन रोखले व तातडीने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले होते. पाथरी येथील दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, एक पोलीस हेडकॉन्स्टेबल, तीन पोलीस नाईक आणि दोन पोलीस शिपाई या कर्मचाºयांना १२ आॅक्टोबर रोजी तातडीने कार्यमुक्त करण्यात आले. वरिष्ठ कार्यालयाकडून बदली करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाºयांना वरिष्ठांच्या आदेशानुसार तातडीने कार्यमुक्त केले असून ८ पैकी एक नवीन पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात रुजू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी दिली.

Web Title: Eight police workers from Thathi Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.