बलात्कार प्रकरणी आठ वर्षांची शिक्षा

By Admin | Published: April 29, 2017 12:34 AM2017-04-29T00:34:54+5:302017-04-29T00:37:15+5:30

अंबाजोगाई : घरात घुसून विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अमजद कटाळू खुरेशी यास ८ वर्षे सक्तमजुरी आणि आठ हजार रूपये दंडाची शिक्षा शुक्रवारी ठोठावली.

Eight years of education in rape case | बलात्कार प्रकरणी आठ वर्षांची शिक्षा

बलात्कार प्रकरणी आठ वर्षांची शिक्षा

googlenewsNext

अंबाजोगाई : घरात घुसून विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अमजद कटाळू खुरेशी यास ८ वर्षे सक्तमजुरी आणि आठ हजार रूपये दंडाची शिक्षा शुक्रवारी ठोठावली.
६ सप्टेंबर २०१२ रोजी पहाटे ४ वाजता पीडित महिलेचा पती भाजी मंडईत कामास गेला असल्याची संधी साधून अमजद कटाळू खुरेशी महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी पीडितेने बचावासाठी आरडाओरड केली असता तिला लोखंडी पाईपने मारहाण केली. हा गोंधळ ऐकून बाजूला झोपलेला फिर्यादीचा भाचा जागा झाला. त्यास आरोपीने बाजूच्या खोलीत कोंडले.
पीडितेच्या फिर्यादीवरून शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्या. एस. व्ही. हंडे यांच्यासमोर सुनावणी झाली.
फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. एल.बी. फड, अ‍ॅड. आर. एम. ढेले, अ‍ॅड.प्रदीप दहिवाळ यांनी सहकार्य केले. या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून होते. (वार्ताहर)

Web Title: Eight years of education in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.