एक लाख मराठा बांधव मोर्चात होणार सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:16 AM2017-07-31T00:16:25+5:302017-07-31T00:16:25+5:30
परभणी : मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी आयोजित राज्यव्यापी मराठा क्रांती महामोर्चासाठी परभणी जिल्ह्यातून एक लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती परभणी येथे ३० जुलै रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी आयोजित राज्यव्यापी मराठा क्रांती महामोर्चासाठी परभणी जिल्ह्यातून एक लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती परभणी येथे ३० जुलै रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत देण्यात आली.
परभणी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या कै.अण्णासाहेब गव्हाणे सभागृहात ३० जुलै रोजी मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी निघणाºया राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली.
जिल्हाभरातून या मोर्चासाठी १ लाख मराठा बांधव सहभागी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे हा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात बैठका घेतल्या जात असून नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी परभणीत नियोजन बैठक पार पडली. गावोगावी जावून बैठका घेणे, बॅनर, स्टिकर, पोस्टर्स आदीच्या माध्यमातून आवाहन केले जाणार आहे. जिजामाता मैदान भायखाळा ते आझाद मैैदान मुंबई असा मोर्चाचा मार्ग राहणार आहे. एकाचवेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन मराठा समाज बांधवांनी चार दिवस आधीच मुंबईत दाखल होण्याचे सांगण्यात आले. ६ आॅगस्ट रोजी ४ रेल्वेगाड्यांनी मुंबईकडे जाण्यास सुरुवात होणार आहे. समाज बांधवांनी शक्यतो सार्वजनिक वाहनानेच मोर्चाला यावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. मोर्चा शिस्तीत निघावा, यासाठी जिल्ह्यातून ५ हजार स्वयंसेवक तयार केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा संपर्क कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.