एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, NDRFच्या निकषांनुसार लम्पी आजारावर मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 06:50 PM2022-09-12T18:50:10+5:302022-09-12T18:50:20+5:30

लम्पी आजारावर एनडीआरएफचे निकष लावण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झालाय, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

Eknath Shinde's Big Announcement: Help on lumpy disease as per NDRF norms | एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, NDRFच्या निकषांनुसार लम्पी आजारावर मदत

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, NDRFच्या निकषांनुसार लम्पी आजारावर मदत

googlenewsNext

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात एका सभेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, जनावरांच्या मृत्यूस कारण ठरणार्या लम्पी आजाराबाबत मोठी घोषणा केली आहे.

एनडीआरएफच्या निकषांनुसार लम्पी आजारावर मदत करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  लम्पी आजारावर एनडीआरएफचे निकष लावण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झालाय, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा जीआर काढण्यात आलाय. गोगलगाईवासून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत निर्णय घेतला गेल्याचे शिंदे म्हणाले.

यासोबतच तीन हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. एनडीआरएफपेक्षा दुप्पट मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधी शेतकऱ्याना पाच हजार रूपये मिळत होते, आता 15 हजार रूपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत यासाठी हे सरकार काम करेल, असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले. 

Web Title: Eknath Shinde's Big Announcement: Help on lumpy disease as per NDRF norms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.