‘शंभर आमदार निवडून आणा, आरक्षण वाचवा’ - ॲड. प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 07:18 AM2024-08-08T07:18:19+5:302024-08-08T07:18:50+5:30
आंबेडकर म्हणाले, आरक्षणाची लढाई ही रस्त्यावर नव्हे, तर विधानसभेत लढली गेली पाहिजे. मताने लढली गेली पाहिजे. डोक्याने लढली गेली पाहिजे. या वेळेसचे मत आरक्षण वाचवणाऱ्यालाच दिले पाहिजे. कारण, दुसरीकडे मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणण्याचे घोषित करण्यात आलेले आहेच.
छत्रपती संभाजीनगर : येथील ‘शंभर आमदार निवडून आणा आणि आरक्षण वाचवा’, असे आवाहन बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेच्या समारोपानिमित्त आमखास मैदानावर आयोजित जाहीर सभेत केले. याचवेळी त्यांनी, आम्ही काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेमुळे राज्यात शांतता निर्माण झाली, गावागावांमधली दहशत संपली, असा दावा करीत, तयारीसाठी आम्हाला वेळ मिळू नये, म्हणून विधानसभा निवडणुका कदाचित दिवाळीआधी होतील, असे भाकीतही वर्तवले.
आंबेडकर म्हणाले, आरक्षणाची लढाई ही रस्त्यावर नव्हे, तर विधानसभेत लढली गेली पाहिजे. मताने लढली गेली पाहिजे. डोक्याने लढली गेली पाहिजे. या वेळेसचे मत आरक्षण वाचवणाऱ्यालाच दिले पाहिजे. कारण, दुसरीकडे मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणण्याचे घोषित करण्यात आलेले आहेच.
ओबीसींच्या बासरीतून मनोज जरांगे यांचे सूर
-मनोज जरांगे पाटील ओबीसींच्या बासरीतून सूर काढीत आहेत.
-त्यांच्या माध्यमातून निजामी मराठ्यांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत ‘ना रहेगी बास, ना रहेगी बासुरी’ हे धोरण ठरवलेले आहे.
-जरांगे निवडणुका लढवणार की नाही, हे २९ ऑगस्टला स्पष्ट होईल; पण माझे म्हणणे आहे की, त्यांनी विधानसभा लढवावीच.
-त्यामुळे निजामी मराठ्यांना अद्दल घडू शकेल, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.