कृउबा समितीच्या सभापती, उपसभापतीची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:03 AM2021-01-21T04:03:56+5:302021-01-21T04:03:56+5:30
या पदांच्या निवडणुकीसाठी २७ ऑक्टोबरला संचालकांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती, पण न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीमुळे ती रद्द करण्यात ...
या पदांच्या निवडणुकीसाठी २७ ऑक्टोबरला संचालकांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती, पण न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीमुळे ती रद्द करण्यात आली होती. संबंधित स्थगिती २२ डिसेंबरला उठल्याने सभापती-उपसभापतीपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.
त्यामुळे २२ जानेवारीला दुपारी २ वाजता संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. अध्यासी अधिकारी म्हणून सिल्लोडचे सहायक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे काम पाहणार आहेत.
दरम्यान, बाजार समितीचे व्यापारी मतदार संघातून निवडून आलेले संचालक प्रकाश अग्रवाल व महावीर गंगवाल यांनी बाजार शुल्क व पर्यवेक्षण शुल्क थकीत ठेवल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) अनिलकुमार दाबशेडे यांनी २० नोव्हेंबरला अपात्र ठरवले होते. त्यामुळे संचालक मंडळाची संख्या १८ वरून १६ झाली आहे.