घाटी रुग्णालयातील डाॅक्टरांना ‘इलेक्शन ड्युटी’, रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता
By संतोष हिरेमठ | Published: March 28, 2024 12:05 PM2024-03-28T12:05:15+5:302024-03-28T12:05:36+5:30
या निवडणुकीबाबतचे प्रशिक्षण त्यांना ४ आणि ५ एप्रिल रोजी देण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील डाॅक्टरांनाही ‘इलेक्शन ड्युटी’ लावण्यात आलेली आहे. घाटी रुग्णालयातील एकूण ९२ जणांना मतदान अधिकारी-कर्मचारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे.
औरंगाबाद लोकसभा निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे १३ मे रोजी मतदान होणार आहे. याकामासाठी घाटीतील एकूण ९२ जणांची मतदान अधिकारी-कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या निवडणुकीबाबतचे प्रशिक्षण त्यांना ४ आणि ५ एप्रिल रोजी देण्यात येणार आहे. अभ्यागत समितीचे सदस्य प्रवीण शिंदे म्हणाले, डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याने रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डाॅक्टरांना इलेक्शन ड्युटी लावण्यात येऊ नये, अशी मागणी केली जाणार आहे.