मनपा सभापती निवडणूक ६ जून रोजी
By Admin | Published: May 22, 2014 12:45 AM2014-05-22T00:45:43+5:302014-05-22T00:56:28+5:30
औरंगाबाद : महापालिका स्थायी समिती सभापती व विषय समिती सभापती निवडणुकीसाठी २ ऐवजी ६ जूनचा मुहूर्त ठरला आहे.
औरंगाबाद : महापालिका स्थायी समिती सभापती व विषय समिती सभापती निवडणुकीसाठी २ ऐवजी ६ जूनचा मुहूर्त ठरला आहे. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज विक्री व स्वीकृतीचे वेळापत्रक २५ मेनंतर जाहीर करण्यात येईल, असे नगरसचिव प्रमोद खोब्रागडे यांनी सांगितले. महिला व बालकल्याण समिती सभापती, उपसभापती, वैद्यकीय साह्या व आरोग्य समिती, शहर सुधार समिती, माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती, समाजकल्याण समिती सभापतीसाठी त्या दिवशी सकाळी १० वाजेपासून सुरुवात होणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विक्रमकुमार हे काम पाहतील. २ जून ही सभापती निवडणुकीची तारीख होती, मात्र त्या दिवशी काही प्रशासकीय कामांमुळे निवडणूक कार्यक्रम ६ जून रोजी ठेवण्यात आला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लोकसभा निवडणूक आचारसंहितेप्रमाणेच मनपा हद्दीत लागू होईल. २८ जूनपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. पालिकेच्या विकासकामांवर या आचारसंहितेमुळे पुन्हा गदा येणार आहे. सभापती निवडणुकीचा कार्यक्रम आचारसंहितेपूर्वीच ठरला असल्याने ती निवडणूक आचारसंहितेत होणार आहे.