महाराष्ट्रात बीआरएस पक्षाच्या पहिल्या सरपंचाची निवड; राजकीय वर्दळीला झाली सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:47 PM2023-06-24T12:47:18+5:302023-06-24T12:48:44+5:30
ही निवडणूक प्रक्रिया गंगापूर तहसीलचे मंडळ अधिकारी ए सी हुगे यांच्या मार्गदर्शननाखाली पार पडली.
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने सरपंच पदाचे खाते उघडले आहे. गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील भारत राष्ट्र समिती पक्षाच्या प्रथम सरपंच सुषमा विष्णू मुळे यांची आज सावखेडा ग्रामपंचायत वर सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, माजी आमदार अण्णासाहेब माने, युवा नेते संतोष आण्णासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली आज सावखेडा ग्रामपंचायत येथे सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये सुषमा विष्णू मुळे यांचे सर्व सदस्यांच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली. सुषमा विष्णू मुळे यांच्या रूपाने भारत राष्ट्र समिती पक्षाला महाराष्ट्र राज्याच्या प्रथम सरपंच निवडून येऊन भारत राष्ट्र समिती पक्षाची गंगापूर खुलताबाद विधानसभा तसेच महाराष्ट्रामध्ये एन्ट्री झाली आहे.
गंगापूर खुलताबाद मतदारसंघात भारत राष्ट्र समिती या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश होत असून आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकीत बीआरएस चमकदार कामगिरी करणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील बीआरएस पक्षाचा पहिला सरपंच असल्याचे बोलले जात आहे. ही निवडणूक प्रक्रिया गंगापूर तहसीलचे मंडळ अधिकारी ए सी हुगे यांच्या मार्गदर्शननाखाली पार पडली.