जिल्ह्यातील ४९ ग्रा.पं.साठी निवडणुका जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:04 AM2017-09-02T00:04:07+5:302017-09-02T00:04:07+5:30
मराठवाड्यातील २0१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून यात हिंगोली जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणाºया ग्रा.पं.चा यात समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मराठवाड्यातील २0१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून यात हिंगोली जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणाºया ग्रा.पं.चा यात समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यासाठी एक महिना चार दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये ७ सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करावयाची आहे. तर १५ ते २२ सप्टेंबरदरम्यान सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ४.३0 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज छाननी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून ते छाननी संपेपर्यंत होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर असून दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. निवडणूक चिन्ह वाटप करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी २७ सप्टेंबरला दुपारी ३ नंतर प्रारंभ होईल. जेथे आवश्यक आहे त्या ठिकाणी ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. ११ आॅक्टोबरला निवडणूक निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ग्रा.पं.सदस्यासह थेट जनतेतील सरपंचपदासाठीही उमेदवार रिंगणात राहणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना वेगळे महत्त्व आले आहे. यात हिंगोली-१६, कळमनुरी-१६, औंढा-७, सेनगावातील १0 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. वसमतमध्ये मात्र सध्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे.